आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत दया – मनसे

Bala Nandgaonkar - CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनामुळे (Corona) मागील ३ महिन्यांपासून पगारापासून वंचित असलेल्या एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. त्यानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेनंतर सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी तात्काळ पगार वितरित करण्याची घोषणा केली. आणि यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

सरकारने एस टी कर्मचाऱ्यांचे केलेले पगार म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, ज्या 2 कर्मचाऱ्यांचे नाहक बळी गेले त्यांच्या परिवाराची होणारी परवड थांबवण्यासाठी सरकारने त्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत दयावी, तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. तसेच इथून पुढे कधीही पगार थकवण्याची नामुष्की येणार नाही याची तरतूद करावी, अशी मागणी नांदगावकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER