मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; वडिलांनी दोन चिमुकल्यांसह संपवलं आयुष्य

Suicide

मुंबई : मुंबईतल्या कांदिवली पश्चिम इथं एक आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली आहे. घरातील तिघांनीही आत्महत्या केली असून यामध्ये वडील  आणि दोन मुली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील  अजगर अली जब्बार अली (वय ४५) तर १२ आणि ९ वर्षांच्या दोन मुली कॅनन आणि सुजैन अशी मृतांची नावं समोर आली आहेत. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. यामध्ये कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तत्काळ कांदिवली पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत असून शेजाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर वडिलांनी मुलींसह आत्महत्या केली की आधी मुलींची हत्या करून मग आत्महत्या केली याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER