माहे रब्बील अव्वल निमित्त जमाते इस्लामी हिंद युथ विंग च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर

६५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी केले रक्तदान

औरंगाबाद : जमात-ए-इस्लामी हिंद युथ विंग च्या वतीने प्रतिवर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुद्धा इस्लामिक कॅलेंड अनुसार माहे रब्बील अव्वल निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. त्या अंतर्गत १० नोव्हेंबर रोजी शहरात तीन ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलेल्या शिबिरात ६५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रात्री उशिरा पर्यंत रक्तदान सुरुच होते.

जमाते इस्लामी हिंद च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचीच शाखा युथ विंग च्या वतीने माहे रब्बीला अव्वल निमित्त शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत शहराच्या तीन ठिकाणी शिबिर लावण्यात आले होते. सकाळी १०.३० वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर चालले. यात युनुस कॉलनी येथील मरकाज ए इस्लामी, पैठण गेट, टाऊन हॉल येथील लाल मस्जिद या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व ठिकाणी शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यात ६५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात रक्त संकलन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीच्या रक्तपेढीचे डॉक्टर व त्यांच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले. तर जमात-ए-इस्लामी युथ विंग डॉ शादाब मुसा, डॉ हसीब अहमद, डॉ सलमान मुकर्रम यांच्या सह जमात-ए-इस्लामी चे शहराध्यक्ष वाजेत कादरी यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी अल्तमश हाश्मी, आसिफ जोहरी, शेख जुबेर, शेख रहीम, शेख अझर, सलमान सिद्दिकी, शेख शाहरुख यांच्यासह ५० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

पोलीस आयुक्तांनी दिली सदिच्छा भेट

या रक्तदान शिबिराला पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी जमात-ए-इस्लामी च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची स्तुती केली. तसेच प्रतिवर्षी युथ विंगच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या रक्तदान शिबिराच्या कार्याबद्दल युथ विंगच्या पदाधिकारी स्वंयसेवकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.