कोरोना : लसीपेक्षा मास्क उपयुक्त; तज्ज्ञांचे मत

Robert Redfield-Mask

मुंबई :   कोरोना (Corona) विषाणूने देशाच्या विविध भागांत प्रचंड वेग घेतला आहे. विदेशातून मेट्रो शहरांमध्ये पसरलेला हा विषाणू आता मेट्रोतून ग्रामीण भागातही वेगाने पसरत आहे. प्रत्येकाने काळजी घेणे हा प्रथमिक उपाय या आजारावर आहे. तसेच, ज्या कोरोना लसीची आतुरतेने वाट पाहात आहेत त्यावर संशोधक दिवस-रात्र मेहनत घेत आहेतच. परंतु, कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वत:ला वाचविण्यासाठी प्रतिबंधक लसीपेक्षा मास्क हे अतिशय प्रभावी व उपयोगी साधन आहे, असे सेंटर आॅफ डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन (Center of Disease Control and Prevention) या संस्थेचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड (Robert Redfield) यांनी म्हटले आहे.

अमेरिकी सिनेटच्या उपसमितीच्या बैठकीत कोरोनासंदर्भात सिनेट सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. रॉबर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, तोंडाला लावायचे मास्क हे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लसीपेक्षाही अधिक उपयोगी ठरतील, असे आम्ही केलेल्या पाहणीतून आढळले आहे. अमेरिकेत कोरोनाची प्रतिबंधक लस या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी सर्वांसाठी उपलब्ध होईल, असे म्हटले जात असले तरी ती साथ निर्मूलनासाठी किती उपयोगी ठरेल, हे आताच कोणालाही सांगता येणार नाही. जलदगती प्रयोगातून तयार केलेली लस फारशी प्रभावी ठरणार नाही, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर रॉबर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली तरी त्यानंतरही लोकांनी मास्क घातले पाहिजेत.

त्यामुळे या साथीवर खूप लवकर नियंत्रण मिळविता येईल. लस बनविण्याचे प्रयोग यशस्वी झाले तरी पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस किंवा तिसऱ्या  तिमाहीच्या सुरुवातीपर्यंत ही लस सर्वांना उपलब्ध करून देता येईल. त्याच्या आधी हे काम होणे शक्य नाही. भारतात कोरोनाने हाहाकार केला आहे.

देशात गुरुवारी कोरोनाचे ९७,८९४ नवे रुग्ण आढळून आले असून, हा एका दिवसातील रुग्णसंख्येचा आजवरचा उच्चांक आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ५१ लाखांवर पोहचली आहे, तर या संसर्गातून आतापर्यंत ४० लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER