मास्क है जरुरी!; आदित्य ठाकरेंनी ‘मास्क’ म्हणताच सेना आमदाराने मास्क चढवला!

Aaditya Thackeray-Prakash Surve

मुंबई :- कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर शासनाने राज्यभर कुठेही फिरताना मास्क लावणं बंधनकारक केले आहे. या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात नाही . मात्र पण याला नागरिकच काही नाही तर राजकारणीसुद्धा मास्क न लावता फिरताना दिसतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मास्क लावणं किती गरजेचं आहे हे सांगत असतात. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या तोंडाला मास्क नसतं.

आदित्य ठाकरेंचं बोलणं चालू असताना सुर्वे यांच्या लक्षात येतं की आपण मास्क लावलेलं नाही. तेव्हा त्यांची मास्क लावण्यासाठीची लगबग कॅमेराच कैद झाली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल माध्यामांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावेळी आदित्य ठाकरेही हसत होते. सुर्वेंना सुद्धा आपला हसण्याचा मोह आवरता आला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER