कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी ‘कोणताही’ मास्क ठरु शकत नाही उपयुक्त!

Maharashtra Today

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेनं भारतात थैमान घातलेलं आहे. मास्कचा नियमीत वापर आपल्याकडून झाला असता तर तिसरी लाट आलीच नसती असं वैद्यकीय तज्ञ सांगतात. मास्क हा कोरोनापासून वाचण्यासाठीचा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोणता मास्क वापरल्यास आपले संरक्षण शक्य आहे यावर आता बरीच चर्चा सुरु आहे. दिल्लीतील तज्ञ डॉक्टर सांगतात की बाजारात तीन प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. जास्तीकरुन कापडाने बनलेले मास्क जास्त वापरले जातात. तर काही जण सर्जिकल (Surgical) तर काही जण एन ९५ मास्क जास्ती प्रमाणात वापरत आहेत.

कापडी मास्क

कोरोनापासून बाचावासाठी कापडी मास्क (Cloth mask) उपयुक्त ठरतो. अमेरिकेच्या ‘सेंटर ऑफ डिजिजेस’ (Center of Diseases) या संस्थेनं देखील कापडी मास्क वापरण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. जेव्हा तुम्ही कापडी मास्क खरेदी कराल तेव्हा तो दोन पदरी आहे याची खात्री करुन घ्या. चेहऱ्याला बांधताना मास्क जास्त फिट होत नाही ना? हे सुद्धा तुम्ही तपासलं पाहिजे. नाक आणि व्यवस्थीत झाकलं जावं याची काळजी आपण घेतली पाहिजे. तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाणार असाल तर शक्यतो कापडी मास्कचा वापर जास्ती करावा.

सर्जिकल मास्क

सर्जिकल मास्क(Surgical mask)हा तुम्ही सिनेमात किंवा प्रत्यक्षात पाहिला असेल. हा हिरव्या रंगात डॉक्टर वापरत असलेला मास्क आहे. यामुळं श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला याचे पदर एकमेकाला चिकटतात. याचा वारंवार वापर तुम्ही टाळायला हवा. त्यामुळं हवा चाळून आत येत नाही. कपड्याच्या मास्कपेक्षा अनेक पटीनं हा मास्क उपयोगी आहे. परंतू गर्दीच्या ठिकाणी जाताना हा मास्क वापरु नये असा सल्लाही दिला जातो.

एन ९५

कोरोनाशी लढण्यासाठी एन ९५ मास्क (N95 Mask)सर्वात प्रभावी असल्याचं मानलं जातं. याची क्षमता इतकी जास्त आहे की ९५ टक्के हवा यातून फिल्टर केली जाते. तुम्ही प्रयत्न करावा की ‘रेस्पिरेटरी वॉल्वचे’ मास्क तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वापरु नयेत. हा मास्क दर आठ तासांनी बदलला तर याचे वाईट परिणाम होत नाहीत. असं शक्य नसल्यास वाळलेल्या कागदात ७२ तासांसाठी हा मास्क ठेवावा. ७२ तासानंतर या मास्कचा प्रभाव संपतो. त्यामुळं जास्तीजास्त पाच वेळा तुम्ही एन ९५ मास्क वापरु शकता.

डबल मास्क

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी डबल मास्क (Double Mask) वापरण्याचा सल्ला दिला जातो. अशातच तुम्ही मास्कच्या वर एक मास्क वापरायला हवा. सर्जिकल मास्कच्या आत कापडी मास्क वापरल्यास कोरोनापासून अधिक प्रभावी पणे संरक्षण होणे शक्य आहे. तसेच श्वास घेतानाही अडचण होत नाही.

या गोष्टींची घ्यावी काळजी

कोणताही मास्क घालता किंवा काढताना त्या आधी हातावर सॅनीटाझर घेणं विसरु नये. मास्कच्या आतल्या स्तरातील कापडाला चुकुनही हात लावणं टाळायला हवं. कोणताही मास्क वापरुन झाला तर त्याची योग्य विल्हेवाट लावायला हवी. अशा प्रकारे योग्य खबरदारी घेतल्यास तुम्ही स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण कोरोनापासून करु शकता. भारतात निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीला नियंत्रणातून आणून स्वतःची सुटका करण्याची ताकदा मास्क देतात. त्यांचा वापर नियमीत व योग्य पद्धतीने केल्यास कोरोनावर नक्की मात करता येणं शक्य आहे. त्यामुळं सर्वच स्तरातून कोरोना टाळण्यासाठी मास्क वापरणं बंधनकारक असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button