मसाबाने सोशल मीडियावर शेअर केला पिता व्हिवियन रिचर्ड आणि आई नीनाचा जुना फोटो

Maharashtra Today

सोशल मीडियामुळे बॉलिवूडमधील बहुतेकांना त्यांच्या आठवणी सार्वजनिक ठिकाणी शेअर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळेच बहुतेक सर्व कलाकार त्यांच्या लहानपणापासून ते बिकिनीतील फोटो आणि व्हिडियो शेअर करून प्रशंसकांसमोर त्यांच्या आठवणी सांगत असतात. कलाकारांचे असे वेगळे आणि जुने फोटो प्रचंड पाहिले जातात आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होतात. मसाबा गुप्तानेही (Masaba Gupta) तिच्या अत्यंत लहानपणीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रख्यात वेस्ट इंडीजचा खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स (Vivian Richards) जमिनीवर बसलेला दिसत असून त्याच्या बाजूला नीना गुप्ता बसलेली दिसते आणि विशेष म्हणजे तिच्या मांडीवर लहानगी मसाबाही दिसत आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आहे.

बॉलिवूडमध्ये नीना गुप्ता तिच्या बिनधास्त वागणुकीसाठी ओळखली जाते. लग्न न करता आई होण्याचे धाडस तिने केले होते. प्रख्यात वेस्ट इंडियन खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्सवर तिचे प्रेम बसले आणि त्याच्याबरोबर ती लग्न न करता राहू लागली होती. व्हिव्हियन रिचर्ड्सपासूनच तिला मुलगी झाली. तीच मुलगी म्हणजे मसाबा. व्हिव्हियन रिचर्ड्स तर वेस्ट इंडीजला परत गेला होता. त्यामुळे नीना गुप्ताने एकटीने बॉलिवूडमध्ये काम करीत करीतच मसाबाचे संगोपन केले. मसाबाला तिचा पिता कोण हे लहानपणापासूनच ठाऊक होते. वेस्ट इंडीजला आईसोबत जाऊन ती पित्याला भेटूनही आली होती. मात्र आईप्रमाणे मसाबा अभिनेत्री झाली नाही तर तिने फॅशन डिझायनिंगकडे लक्ष दिले आणि आज ती एक चांगली फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाते. मसाबा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून ती सतत काही ना काही तरी सोशल मीडियावर शेअर करीत असते.

मसाबाने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोची माहिती आम्ही तुम्हाला वर दिलीच आहे. त्या फोटोत व्हिव्हियन रिचर्ड्स, नीना गुप्ता आणि तिच्या मांडीवरील मसाबा दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती काही व्यक्तींसोबत दिसत आहे. त्या व्यक्ती कोण आहेत त्याची माहिती मात्र तिने दिलेली नाही. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये मसाबाने म्हटले आहे, ‘माझे जग, माझ्या रक्ताची नाती’ मसाबाच्या या दोन्ही फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडला आहे. एवढेच नव्हे तर हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरलही झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER