ऋतिकला भेटण्यासाठी न जेवण्याचा निर्णय घेतला होता मसाबाने

Masaba - Hritik Roshan

बॉलिवूड (Bollywood) आणि छोट्या पडद्यावरील प्रख्यात अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांची मसाबा (Masaba) ही एकुलती एक लेक. प्रख्यात वेस्टइंडियन क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्डबरोबर नीना गुप्ता लिव इनमध्ये राहात होती आणि त्याच्यापासून नीनाला झालेले मूल म्हणजे मसाबा. नीना गुप्ताने लग्न न करता मसाबाला एकहाती सांभाळले. मसाबा आईप्रमाणे अभिनेत्री झाली नाही पण फॅशन डिझाइनर मात्र अवश्य झाली. संपूर्ण देशभरातील लोकांसह मसाबाही ऋतिक रोशनची फॅन आहे. मसाबाने ऋतिक रोशनसोबतचा (Hritik Roshan) एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ती ऋतिकची किती मोठी फॅन आहे ते सांगितले आहे.

मसाबाने शेअर केलेला फोटो हा 20 वर्ष जुना म्हणजेच 2000 चा आहे. या फोटोत मसाबा ऋतिक रोशनच्या बाजूला बसलेली दिसत आहे. ऋतिक रोशनचा कहो ना प्यार है तेव्हा प्रदर्शित झाला होता आणि प्रचंड लोकप्रियही झाला होता. लहानथोर सगळे ऋतिकचे फॅन झाले होते. फोटोसोबत मसाबाने लिहिले आहे, ऋतिकसोबतचा हा फोटो ‘कहो ना प्यार है’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीचा आहे. तेव्हा मी 11-12 वर्षांची होती. ऋतिकचा ‘कहो ना प्यार है’ प्रदर्शित होणार होता. तेव्हा मी माझ्या आईला सांगितले की, मला ऋतिकला भेटायचे आहे. मी एका मस्तीखोर मुलाप्रमाणे वागत असे त्यामुळे जोपर्यंत ऋतिकशी भेट होत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही अशी धमकी मी आईला दिली होती असेही यात मसाबाने म्हटले आहे.

मसाबाने शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून मसाबाच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा मारा केला आहे. मसाबाच्या एका फॅनने लिहिले आहे, तू खूपच क्यूट दिसत आहेस. तर दुसऱ्या एका फॅनने लिहिले आहे, ‘हे खूपच गोड आहे मसाबा, खूपच चांगली आठवण.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER