स्वतःच्या वडिलांना आणि भावाला जिवंत जाळणारी इंग्लंडची राणी मेरी

Mary, Queen of England, burnt alive her father and brother

इंग्लंडची महाराणी (Queen of England) मेरी प्रथम ही खुनी मेरीच्या नावानं बदनाम आहे. इंग्लंडचा राजा हॅनरी (Henry) आठची पहिली मुलगी जिनं आयुष्यात फक्त एक स्वप्न पाहिलं इंग्लंडच्या सिंहासनावर बसायचं. त्यासाठी ती कोणत्याही टोकाला जायला तयार होती. सिंहासनावरती बसण्यासाठी वाट्टेल ते करायला ती तयार होती.

तिच्या पित्यानं राजा हॅनरी आठवा याने मेरीला उत्तराधिकारी म्हणून नाकारलं. याचा बदला म्हणून तिनं इंग्लंडच्या राजाविरोधात, स्वतःच्या वडिलांविरोधात विद्रोह इतक्या ताकदीनं केला की, इंग्रज सैन्याला तिच्यासमोर गुडघे टेकायला लावले. मेरी ट्यूडर एक कॅथलिक ख्रिश्चन होती जिला संपूर्ण इंग्लडला कॅथलिक राज्य बनवायचं होतं. या प्रक्रियेत तिच्या वडिलांद्वारे चालवल्या जाणाऱ्या प्रोटेस्टंट धर्माच्या अनेक ख्रिश्चनांचा तीनं जीव घेतला.

इंग्लंडवर वर्चस्व मिळवण्यासाठी तिनं स्वतःच्या पित्याची आणि सावत्र भावाचा जीव घेतला. मेरीला वाटायचं की, तिच्या मुलानं पुढं तिची गादी चालवावी पण ती कधीच आई होवू शकली नाही.

राजा हॅनरीला मुलगा हवा होता म्हणून…

१८ फेब्रुवारी १५१६ला ग्रीनवीच पॅलेसमध्ये राजा हॅनरी आठवा आणि एरागॉन कॅथनरीन यांच्या घरी ७ वर्षानंतर बाळानं जन्म घेतला. ती एक मुलगी होती. मेरी ट्यूडर असं तिच नाव ठेवण्यात आलं. मेरीच्या जन्मापासूनच हॅनरी दुःखात राहू लागला. त्याला वंश वाढवायचा होता. मुलाशिवाय हे शक्य नव्हतं. १५२०ला पुत्र होत नसल्यानं त्यान पहिल्या पत्निला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. १५२७ला कॅथलिक चर्चच्या पोपनं राजा हॅनरीचं लग्न रद्द करायला नकार दिला.

हॅनरीनं पोपशी आणि पर्यायानं रोमशी सारे संबंध तोडले. १५३३ला त्यान दुसरं लग्न केलं. पोपशी संबंध नसल्यामुळं तोच इंग्लंडच्या चर्च प्रमुख बनला. दुसरी पत्नही त्याला मुलगा देवू शकली नाही. यानंतर त्याने चार विवाह केले. तिसऱ्या पत्निचा मुलाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला.

सिंहासनापर्यंत पोहचणं इतकं सोप्प नव्हतं

१५३३ ला एनी बोलेनशी हॅनरीचं लग्न झालं. मेरीला अनावरस घोषित करण्यात आलं. त्यामुळं ती सिंहासनाची उत्तराधिकारी होऊ शकत नव्हती. हॅनरीनंतर १५४७ ला त्याच्या इच्छेनूसार एडवर्ड राजा बनला. त्याच्याच शासन काळात इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट धर्माची स्थापना झाली. यामुळं त्याची कॅथलिक बहिण मेरी हिच्यासोबत त्याचे संबंध बिघडले.

१५५३ला राजा एडवर्डला गंभीर आजार झाला. त्याने मेरीचा सिंहासन बळकावण्याचा डाव उलथून लावायचा होता. त्याची इच्छा होती की इंग्लंडमध्ये न कथी कॅथिलिजमची पुनर्स्थपाना व्हावी न मेरी कधी राणी बनावी. त्याने त्याची चुलत बहिण लेडी जेन ग्रेला राणी घोषित केलं. जेनच्या सासऱ्यानं मेरीला पकडायला मोठं सैन्य पाठवण्याचा डाव आखला. ही योजना कृतीत उतरायच्या आत मेरीनं मोठं सैन्य एकत्र करुन राजधानीवर चढाई केली. राज्य जिंकलं स्वतःला राणी घोषित केलं.

विद्रोहाची ठिणगी विझवली

१५५४ला इंग्लंडमधला एक गट मेरीला सिंहासनावरुन हटवण्यासाठी काम करत होता. राणी मेरी स्पेनचा राजकूमार फिलिपशी लग्न करणार होती. आणि संपूर्ण इंग्लंडला कॅथलिक राष्ट्र बनवण्याचा तिचा मनोदय होता. राणीनं स्पेनच्या राजकूमाराशी लग्न केलं तर परकीयांची चाकरी करायला लागेल याची भीती त्यांना होती. म्हणून त्यांनी विद्रोह करायचं ठरवलं पण ही बातमी मेरीच्या कानावर आली. विद्रोहासाठी जनतेला उत्तेजीत करणाऱ्या १०० पुढाऱ्यांना तिनं अटक केली आणि नंतर फाशी दिली. लेडी ग्रे आणि तिच्या पित्याचा या विद्रोहाशी काही संबंध नव्हता पण लोकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी त्या दोघांचाही तिनं शिरच्छेद केला.

शेकडोच्या हत्या केल्यामुळं तिचा उल्लेख खुनी मेरी असा केला जातो.

सत्तेवर असताना तिनं इंग्लंडमध्ये परत कॅथलिक धर्माची स्थापना केली. प्रोटेस्टंटला नाकारलं. मेरीनं पुन्हा रोमन कॅथलिक बिशप पदाला सर्वोच्च घोषित केलं. इंग्लंडमध्ये धर्मांतराविरोधात तिनं कठोर कायदा आणला. यामुळं ३०० जणांना जीव गमवायला लागला. मेरीला सिंहासनावरुन हटवण्यासाठी विद्रोहाची तयारी करणारे हे प्रोटेस्टंट होते. त्या सर्वांना जिवंत जाळून मारण्याचा तिनं आदेश दिला.

या तिनशे जणांमध्ये मेरीचे वडील हॅनरी आठवा, तिचे सावत्र भाऊ आणि थॉमस क्रॅनमर होता. थॉमस तो व्यक्ती होता ज्याने मेरीची आई एरागॉन आणि राजा हॅनरी आठवा यांच्या लग्नास अवैध मानलं होतं.

मेरीनं आयुष्यभर उराशी बाळगलेल्या दोन स्वप्नांपैकी इंग्लंडला कॅथलिक राष्ट्र बनवण्याच स्वप्न ती कधीच पुर्ण करु शकली नाही. ती राणी बनली. प्रचंड रक्तपात केला. बापाचा आणि भावांचा जीव घेतला. अशा या खुनी मेरीचा इन्फ्लूएंजा रोगामुळं वयाच्या ४२व्या वर्षी मृत्यू झाला.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER