दहशतवादी हल्ल्यात कोल्हापुरातील शहीद

Kolhapur

कोल्हापूर : जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये १६ मराठा बटालियनवर पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा या गावचे जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले आहेत. वीर जवान हवालदार संग्राम पाटील १६ मराठा अशोक चक्र बटालियनचे जवान होते.

वीरमरण आल्याने निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER