शहीद जवान ऋषिकेश जोंधळे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान ऋषिकेश जोंधळे

कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे (Rishikesh Jondhale) यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात आज अखेरचा निरोप देण्यात आला. ऋषिकेश जोंधळे यांच्यावर आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. ऋषिकेश जोंधळे यांना त्यांचे चुलत बंधू दीपक जोंधळे यांनी मुखाग्नी दिला. यावेळी कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या अश्रूचा बांध फुटला.

ऋषिकेश जोंधळे हे एकुलते एक होते. एकुलता एक असल्याने कुटुंबीयांनी सैन्यात जाण्याला विरोध केला, पण 2018 साली एकदा प्रयत्न करतो म्हणून घरातल्यांची समजूत काढली आणि पहिल्याच प्रयत्नात ऋषिकेश सैन्यात भरती झाले. पहिलीच पोस्टिंग जम्मू काश्मीरला झाले. गेल्या बुधवारी ऋषिकेश यांचा वडिलांसोबत फोनवरुन संवाद झाला होता.
ऋषिकेश यांना एक छोटी बहीण आहे. आज भाऊबीजचा दिवस भावाला ओवळण्याचा दिवस. मात्र आजच्याच दिवशी ऋषिकेश यांची बहिण कल्याणीला भावाला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली.

जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ सेक्टर दरम्यान शुक्रवारी (13 नोव्हेंबर) अनेक ठिकाणी नियंत्रण रेषेत (एलओसी) युद्धबंदी कराराचे पाकिस्तानी सैन्याने उल्लंघन केले. या गोळीबारात 5 जवान शहीद झाले. तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमगण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीत 20 आणि 28 वर्षांचे हे सुपुत्र शहीद झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER