हा कोण ज्याने दोन वर्षात एकसुध्दा धाव केलेली नव्हती?

T. Natarajan

आयपीएलमध्ये (IPL) सोमवारी सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) जबरदस्त घसरगुंडीची सर्वत्र चर्चा आहे. या घसरगुंडीने त्यांची अवस्था एवढी खराब केली होती की जायबंदी असतानाही मिचेल मार्शला (Mitchell Marsh) फलंदाजीला उतरावे लागले आणि हे तर काहीच नाही, त्यांचा शेवटचा गडी थंगासारु नटराजन (T. Natrajan) याला महत्त्वाच्या सामन्यात दोन वर्षात पहिल्यांदाच धाव करायची संधी मिळाली.

होय, तुम्ही वाचतांय ते खरंय, टी. नटराजनने दोन वर्षात पहिली धाव काल केली. डिसेंबर 2018 पासून या गड्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये धाव केलेली नव्हती. गेल्या 12 डावांमध्ये हा गडी कधी शून्याच्यापुढे सरकलाच नाही. या 12 डावांत तो सात वेळा शून्यावरच नाबाद राहिला. मात्र काल शेवटी त्याला धाव काढायची संधी मिळाली. तो 4 चेंडूत 3 धावा काढून नाबाद राहिला. डिसेंबर 2018 नंतरच्या त्याच्या या पहिल्या धावा होत्या. मधल्या काळात त्याने प्रथम श्रेणी, मर्यादीत षटकांचे सामने किंवा टी-20 सामन्यांमध्येसुध्दा एकही धाव केलेली नाही.

नटराजन हा तामिळनाडूचा डावखुरा गोलंदाज. 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात घेतले होते. त्यावेळी तो अनकॕप खेळाडूंमध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. किंग्ज इलेव्हनसाठी तो सहा सामने खेळला पण त्याच्यावर फलंदाजीची वेळ एकदाही आली नाही. मात्र आता हैदराबादसाठी खेळताना पहिल्याच सामन्यात त्याला फलंदाजीला उतरावे लागले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER