चोरून लग्न करता आणि बापाला संसार चालवायला सांगता? दानवेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

Raosaheb Danve & Uddhav Thackeray

जालना : कुठल्याही संकटात मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारला – चोरून लग्न करता आणि बापाला संसार चालवायला सांगता?

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती करून निवडणूक लढवली आणि निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता प्रत्येक संकटाच्या वेळी केंद्राकडे मदत मागत आहेत, यावरून दानवे यांनी – चोरून लग्न करता आणि बापाला संसार चालवायला सांगता? असा टोमणा मारला आहे.

ते म्हणालेत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गतवर्षी अशाच परिस्थितीत दौरा केला. तेव्हा पंचनामे बाजूला ठेवून मदतीची मागणी केली होती! तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. ठाकरे हे विसरले नसावेत. महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस झाला. अतिवृष्टी झाली. मग एका – एका शेतकऱ्याचे पंचनामे करत बसायला कुठे वेळ घालवता. सरसकट पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा.

तुम्ही सतत केंद्राडे बोट दाखवता. तुम्ही चोरून लग्न केले, आता बापाला संसार चालवायला सांगता? मग कशाला चोरून लग्न केल? असे दानवे म्हणाले. केंद्र सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही केंद्र सरकारला कळवा, केंद्र सरकार मदत करण्यासाठी तयार आहे असे दानवे म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER