कोल्हापूर : विवाहितेचा गळा दाबून खून

Sarika Murder

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून आणि तोंडावर ठोसे मारून अमानुषपणे खून केल्याची घटना करवीर तालुक्यातील वडणगे-निगवे रस्त्यावर घडली. सारिका विठ्ठल महानुर (वय 21, रा. वडणगे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. सारीका हिचा पती विठ्ठल हा पसार झाला आहे. कौटुंबिक वादातून हा खुन झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे येत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर आणि पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.

नराधम पित्याला दहा वर्षे सश्रम कारावास

सारीका व विठ्ठल यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वडणगे-निगवे रस्त्यावरील एका ठिकाणी ते भाडेकरू म्हणून रहात होते. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.