१६ व्या वर्षी लग्न झालं, २१ व्या वर्षी पहिल्या महिला पायलट बनल्या !

Maharashtra Today

जगभरातल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं विमान उडवणं, आकाशाला गवसणी घालणं. परंतू खुप कमी जण हे स्वप्न पुर्ण करतात. त्या निवडक लोकांपैकी एक आहेत सरला ठकराल. ज्यावेळी भारतीय महिलांवर उंबरा ओलांडता येत नव्हता त्यावेळी सरला यांनी आकाशात झेप घेतली होती. भारताच्या पहिल्या महिला पायलट( First female pilot ) बनून. १९१४ साली दिल्लीच्या ठकराल परिवारात सरला(Sarla) यांचा जन्म झाला. त्यावेळी परिस्थीती स्त्रीयांसाठी प्रतिकुल होती. महिलांना करिअरसाठी विशेष काही संधी मिळत नव्हत्या. सरला यांचं इतर मुलींप्रमाण वयाच्या १६ व्या वर्षी लग्न करण्यात आलं. त्यांचे पति पायलट होते. सरला अधुनिक विचाराच्या होत्या. लहानपणापासून आकाशात विमान उडवण्याचं सरला यांच स्वप्न होतं. ही गोष्ट ऐकून त्यांच्या पतींना आनंद झाला. त्यांनी सरला यांच्या स्वप्नाला पुर्णत्त्वाकडे नेण्यास मदत केली.

पतिच्या बोलण्यावर सरला यांनी सुरुवातीला विश्वास ठेवला नाही. नंतर मात्र सरला यांच्या पतींनी सरला यांना पायलटचं प्रशिक्षण घेण्यासाठी राजी केलं. इतकच नाही तर त्यांच्या घरातले लोकही या निर्णयाच्या विरोधात नव्हते. त्यांचीही इच्छा होती की सुनेनं वैमानिक बनावं.

साडीचा पेहराव करुन विमानात प्रवेश

पति आणि कुटुंबाचं ऐकल्यानंतर सरला यांनी विमानाबद्दल पुर्ण माहिती मिळवली. एक विमान कशा पद्धतीने काम करते हे त्यांना शिकवण्यात आलं. सरला यांनी प्रामाणिकपणे विमानाविषयक माहिती मिळवली. जेव्हा शर्ट आणि पँट घालून फक्त पुरुषच पायलट केबिनमध्ये बसत तेव्हा सरला साडीच्या पेहराव्यात कॉकपीटमध्ये विमानविषयी सर्व बाजूंनी माहिती मिळवत होत्या. त्यांना साडीमध्ये विमानाच्या कॉकपीटमध्ये बघितल्यानंतर फ्लाइंग क्लबचा प्रत्येक सदस्य दंग होता.

पायलट लायसन्स मिळवल्यानंतर घडवला इतिहास

पहिल्यांदाच सरला यांनी विमान उडवलं. त्यांच्या विमानाचं उड्डाण बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. याआधी त्यांनी कधीच कोण्या महिलेला विमान उडवताना पाहिलं नव्हतं. सरला यांचं पहिलं उड्डाण यशस्वी झालं. परंतू वैमानिकाचा परवाना मिळवण्यासाठी त्यांना आणखी एकदा उड्डाण भरणं गरजेचं होतं. पहिल्या उड्डाणानंतर त्यांना ‘बी लायसन्स’ मिळालं. या लायन्सवर त्या कर्मशिअल पायलट बनू शकत नव्हत्या. कर्मशिअरल पायलट बनण्यासाठी सरला यांना तब्बल १ हजार तास विमान उडवायचं होतं. ही वेळ पुर्ण करण्यासाठी त्यांना अनेकदा विमान उडवावं लागणर होतं. म्हणतात की हे काम करताना अनेकांना घाम फुटतो.

सरला ही कामगिरी पुर्ण करतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि १ हजार तासांचं उड्डाण पुर्ण केलं. यामुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी ‘ए लायन्स’ मिळवलं. यामुळं त्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक बनल्या. त्यावेळी सरला यांच वय होतं मात्र २१ वर्षे. सरला यांची जिद्द किती मोठी होती हे यावरुन कळतं.

पतिच्या मृत्यूचा मनावर आघात झाला

पायलट बनल्यानंतर सरला यांनी स्वतःच्या कटुंबाला वेळ दिला. त्या आई बनल्या. त्यांच आयुष्य सुखात सुरु होतं. १९३९ ला त्यांनी पुन्हा जोधपूर फ्लाइंग क्लबमध्ये (Jodhpur Fying Club)वैमानिकाचं प्रशिक्षण सुरु केलं. त्यांच्या ध्येयासाठी त्या खुप मेहनत करत होत्या. काही दिवसात त्यांना खबर मिळाली की त्यांच्या पतीचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. यामुळं त्यांच्या मनावर आघात झाला. सरला कर्मशिअल पायलट बनव्यात असं त्यांच्या पतींच स्वप्न होतं परंतू त्यांचे पती जगसोडून गेल्यामुळं सरला यांच्या मनावर आघात झाला. पुढं त्यांनी स्वतःला एव्हिएशन क्षेत्रापासून वेगळं करुन घेतलं नंतर कधीच त्यांनी विमान उडवलं नाही. पुढं २००८ साली त्यांच निधन झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button