धोकेबाज सेनेचं ‘लग्न एकाशी, लफडं दुसऱ्याशी’, मनसेची जहरी टीका

Sandeep Deshpande - CM Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) हा सुपारीबाज पक्ष असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे (Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची खोटक टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना झाल्याचा हल्लाबोल देशपांडे यांनी केला आहे.

सुपारी घेतल्याशिवाय मनसे काम करु शकत नाही. त्यावरच त्यांचं अस्तित्व अवलंबून असल्याचा घणाघात अनिल परब यांनी मनसेवर केला होता. त्यावर संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेनं हिंदुंच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वबळावर सत्ता मिळवणार असल्याचं सांगितलं होतं. पण आता राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेससोबत (Congress) सत्तेत बसले आहेत. अशा शब्दात देशपांडे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय मनसेनं घेतला नाही. शिवसेनेनं मनसेचे नगरसेवक फोडले. उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांनी मनसेला प्रस्ताव दिला होता. शिवसेनेनं धोकेबाजी केल्यामुळे त्यावेळी युती झाली नाही. शिवसेनेचा जीव महापालिका रुपी पोपटामध्ये अडकला आहे. आज मंत्रालयाचा पत्ता ‘कृष्णकुंज’ झाला आहे. ‘कृष्णकुंज’चं महत्व वाढल्यामुळेच शिवसेनेच्या पोटात दुखत आहे”, अशी खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER