मार्लोन सॅम्युअल्सने केली बेन स्टोक्सला शिवीगाळ

Ben Stokes - Marlon Samuels

खेळ हे खेळाडूवृत्ती शिकवतात, माणसाला दिलदार बनवतात असे म्हटले जाते. कितीही पराकोटीची स्पर्धा मैदानावर असली तरी मैदानाबाहेर प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांचे मित्र असतात. मात्र वेस्ट इंडिजचा (West Indies). क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल्स (Marlon Samuels) हा याला अपवाद आहे आणि त्याने इंग्लंडचा (England) अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्यावर अलीकडेच जी शेरेबाजी केली आहे आणि त्यासाठी जी भाषा वापरलीय त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे. सॅम्युअल्सने ही शेरेबाजी स्टोक्स व त्याच्यापुरतीच मर्यादीत ठेवलेली नाही तर या वादात स्टोक्सच्या पत्नीलासुध्दा ओढले आहे.

अतिशय खालच्या पातळीवर सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये सॅम्युअल्सने स्टोक्सला उद्देशून म्हटलेय, “कोणताही गोरा मला खेळातून बाहेर करु शकत नाही. तुझी बायको माझ्याकडे पाठव. तिला 14 सेकंदात जमैकन करुन दाखवतो. तुला मी काय आहे ते माहित नाही.

सॅम्युअल्सची ही प्रतिक्रिया बेन स्टोक्सने एका टेस्ट मॕच स्पेशल पॉडकास्टमध्ये केलेल्या विनोदानंतर आली. त्यात त्याने गमतीने म्हटले होते की 14 दिवस क्वारंटाईन होण्याची वेळ माझ्या दुश्मनावरसुध्दा येऊ नये. यावर त्याच्या भावाने विचारले की यात तू मार्लोन सॅम्युअल्सबद्दलही बोलतोय का ? तर बेन स्टोक्स ‘नाही’ असे उत्तरला होता.

या खेळाडूंमधले संबंध 2015 मध्ये बिघडले ज्यावेळी सॅम्युअल्सने ग्रेनेडा कसोटीत स्टोक्सला बाद केले होते आणि त्यानंतर सॕल्यूटची नक्कल करत त्याला चिडवले होते. यानंतर 2016 च्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यातही या दोघांत चकमक झडली होती.

स्टोक्स हा अलीकडेच आपल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी न्यूझीलंडमध्ये गेला होता आणी आयपीएलसाठी दुबईमध्ये परतल्यावर त्याला क्वारंटाईन व्हावे लागले होते.

याबद्दल 29 वर्षीय स्टोक्स म्हणाला की, विमानातून उतरायचे, बॕग उचलायची आणि ते सांगतील त्या हाॕटेलात जायचे. ती हाॕटेल कशी, काय हा प्रश्नच नाही. सरकारने क्वारंटाईन होण्यासाठी काही ठराविक,हाॕटेल्स निश्चित केलेल्या आहेत. त्याचे अनुभव मी इन्स्टाग्रामवर शेअर केले. माझे मित्र विचारत होते की कसा अनुभव होता तर तो काही फार चांगला अनुभव नव्हता. माझ्या शत्रुवरसुध्दा अशी वेळ येऊ नये. हीच गोष्ट मी माझ्या भावाला टेक्स्ट मेसेजने कळवली तर तो म्हणाला की सॅम्युअल्सबद्दलही तुला असेच वाटते का? तर मी म्हणालो की, नाही, हा अनुभव तेवढाच वाईट आहे.

सॅम्युअल्सने याच्या उत्तरात मात्र अतिशय अशोभनीय भाषैत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने शेन वाॕर्नवरही टीका केली आहे. त्याने म्हटले की बेन स्टोक्स, शेन वाॕर्न आणि काही वेस्ट इंडियन खेळाडू विकले गेलेले आहेत आणि हो, मी अतिशय खराब माणूस आहे, बोला काय म्हणायचेय?

सॅम्युअल्सच्या या विधानांवर सर्वच थरातून नाराजी व्यक्त झाली असुन अनेकांनी सॅम्युअल्स हा वर्णभेदी असुन त्याचे हे बोलणे बरोबर नसल्याचे म्हटले आहे. स्टोक्सने मात्र या विषयावर गप्पच राहणे पसंत केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER