बाजारपेठेत लगीनघाई : दिवाळीनंतर बाजारपेठेत गर्दी

बाजारपेठेत लगीनघाई - दिवाळीनंतर बाजारपेठेत गर्दी

पुणे : कोरोना (Corona) काळात सहा महिने ठप्प असलेल्या बाजारपेठेत कोरोना संसर्ग कमी झाल्याने दसऱ्यानंतर उत्साह संचारला. दिवाळीनिमित्त (Diwali) कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गृहपयोगी वस्तू, वाहन आदींची ग्राहकांनी जोमाने खरेदी केली. दिवाळीनंतरही बाजारपेठेत गर्दी कायम आहे. लग्नसराई सुरु झाल्याने कपडे, दागिने, गृहपयोगी वस्तू खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. ग्राहकांसाठी विविध ऑफर्स देवू केल्याने खरेदीला उधाण आल्याचे चित्र आहे.

यंदाच्या वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाची चाहुल लागल्याने बाजारपेठेतील व्यवहार मंदावला. मे महिन्यापासून उद्योग व्यापार बंदसदृष्ट अवस्थेत गेला. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे उन्हाळ्यात होणारी लग्नसराई आणि इतर शुभ कार्यक्रमांना ब्रेक लागला. ऑगस्टनंतर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभास परवानगी मिळाली तरी मुहूर्तामुळे धार्मिक कार्यास मर्यादा आल्या होत्या. सर्वसाधारणपणे दिवाळी आणि तुलसीविवाह झाल्यानंतर नवीन वर्षातील लग्न सराईस सुरुवात होते. कोरोना संसर्ग कमी झाला आहे. सार्वजानिक व्यवहारात असलेली मर्यादा शासनाने कमी केली आहेत.

कोरोनामुळे ठप्प झालेले व्यवहार आणि उद्योग आता हळुहळू पूर्वपदावर येत आहेत. पाऊस पर्जन्यमान चांगले झाल्याने भाजीपाला, ऊस आदि पिकांचे उत्पादन चांगले आहे. ऊस तोडणी सुरु होवून त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दुध दरातील फरक, संस्थांचा लांभाश मिळाला आहे. शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांचे पगार आता पूर्वव्रत झाले आहेत. यासर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून बाजारपेठेत पूर्वीसारखी नसली तरी ठप्प झालेल्या व्यवहाराने मोठी गती घेतली आहे.

लग्न सराई सुरु झाल्याने किराणा वस्तू, कपडा व्यापार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गृहपयोगी वस्तू, सोने-चांदी, वाहन खरेदीसाठी पसंदी दिली जात आहे. यानिमित्ताने बाजारपेठेत गर्दी होत आहे. कपड्याचे जथ्ये काढण्यासह सोने खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. जेवणावळीच्या निमित्ताने किराणा मालाची खरेदी होत आहे. दिवाळीनंतर बाजारपेठेत ऑफर्स सुरू आहेत. यासर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी असल्याचे चित्र आहे.

कोरोनाची भिती संपली

दिवाळीनिमित्त होणारी गर्दी आणि वातावरणात वाढणारा गारठा यामुळे युरोप आणि उत्तर भारताप्रमाणे कोरोना संसर्ग वाढणार असल्याची भिती व्यक्त केली जात होती. मास्क आणि सामाजिक अंतराचे निकष पाळले जात आहेत. वेळीच औषध उपचार घेत असल्याने कोरोना संसर्गाला रोखण्यात यश आले आहे. कोरोनाची भिती संपल्याने बाजारपेठेत गर्दी आहे. लोक व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER