बाजारात उत्साह, निफ्टी ११ हजाराच्या वेशीवर

एक दिवसाआड वधारतोय बाजार

share bajar

मुंबई :- रिझर्व्ह बँकेच्या निमित्ताने अर्थव्यवस्था स्थिरावल्याचे चित्र निर्माण झाल्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. दोन्ही शेअर बाजारात एक दिवसाआड तेजी असली तरी एकूण व्यवहार बºयापैकी सामान्य होताहेत. बुधवारच्या तेजीनंतर राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी ११ हजार अंकांच्या वेशीवर पोहोचला आहे.

सोमवारी वाढ व मंगळवारी घट झाल्यानंतर बुधवारी मात्र मुंबई शेअर बाजारात उत्साह होता. दुपारी साडेबारापर्यंत बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक ४० ते ५० अंक वर-खाली होत होता. पण त्यानंतर बाजारात खरेदी वाढली. रिझर्व्ह बँकेच्या निमित्ताने बँकिंग शेअर्सची खरेदी अधिक होती. दोन तासात सेन्सेक्स जवळपास १०० अंक वधारला. दिवसअखेर नफेखोरीमुळे बाजार काहीसा घसरुन मंगळवारच्या तुलनेत १३७ अंक वाढीसह ३६,४८ वर बंद झाला.

दुसरीकडे निफ्टीत मात्र पूर्णपणे संतुलित व्यवहार सुरू आहेत. बुधवारी बाजार १०,९८५ पर्यंत वाढला. मागील आठवड्यात निफ्टी १०,७०० दरम्यान बंद झाला होता. हा निर्देशांक १०,८०० दरम्यान असणे बाजारासाठी चांगले सिग्नल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसे असताना बुधवारी मात्र निफ्टी सातत्याने १०,९०० च्यावर होता. दिवसअखेर ५८ अंकांच्या वाढीसह निफ्टी १०,९६७ वर बंद झाला.