येत्या १ जूनपासून दोन महिने सागरी मासेमारी बंद

Marine fishing

रत्नागिरी/प्रतिनिधी : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार मासळीच्या साठ्याचे जतन करण्याच्या हेतूने येत्या १ जून ते ३१ जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे.

या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. ही मासेमारी बंदी यांत्रिकी मासेमारी नौकांना लागू असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत यांत्रिकी मासेमारी नौका बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास ती नौका आणि त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल. तसेच अधिकाधिक कठोर शिक्षा केली जाईल. तसेच बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिकी मासेमारी नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून नुकसानभरपाई मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER