विल यू ‘मारिया’ मी? आणि ती म्हणाली, ‘यस’!

Maria Sharapova - Alexander Gilkes

अलीकडच्या काळातील सर्वात देखणी टेनिस स्टार आणि धनवान खेळाडूंमध्ये गणली जाणारी मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) हीने ब्रिटीश धनपती अॕलेक्झांडर गिल्कस (Alexander Gilkes) याच्याशी वांड्निश्चय (Engagement) केली आहे. मारियाने यंदाच व्यायसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली आहे. शारापोव्हा व गिल्कस् यांनी आपले प्रेमप्रकरण बरेच दिवस गुप्त ठेवले पण अलीकडेच शारापोव्हाने त्यांच्या आॕक्टोबर 2018 मधील एका रोमांटीक ट्रीपचे फोटो व्हायरल केल्याने त्यांच्यात जवळीक असल्याचे उघड झाले. जानेवारी 2018 पासूनच या दोघांचे प्रेमप्रकरण बहरले असल्याची चर्चा आहे.

41 वर्षीय गिल्कस् हा धनाढ्य व्यावसायिक असून तो आॕनलाईन लिलाव संस्था पॕडल एटचा संस्थापक अध्यक्ष आहे. तो आधीच विवाहबध्द आहे. त्याची पहिली पत्नी मिशा नोनू ही ब्रिटीश राजघराण्याची सून मेघन मार्कल हिची जवळची मैत्रीण आहे.

गिल्कस् हा एटन काॕलेजात प्रिन्स हॕरी व प्रिन्स विल्यम यांच्यासोबत शिकलेला आहे आणि नोनुसोबत चार वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर 2016 मध्ये ते विभक्त झाले होते. आता तो जगातील माजी नंबर वन टेनिसपटूशी विवाहबध्द होणार आहे.शारापोव्हाने इन्स्टाग्रामवर त्यांची काही छायाचित्रे टाकून स्वतः ही बातमी दिली आहे. त्याच्या फोटो ओळीत तिने म्हटलेय, ” पहिल्या भेटीतच मी त्याला ‘हो’ म्हणाले. हे आमचे छोटेसे सिक्रेट होते, हो की नाही!” (“I said yes from the first day we met.”This was our little secret, wasn’t it.”)

यावर गिल्कसने ही उत्तरात म्हटलेय, “मला खूप खूप आनंदीत केल्याबद्दल धन्यवाद.एका आनंद सहजीवनाची आणि तुझ्याकडून बरेच काही शिकण्याची मला आशा आहे.” (“Thank you for making me a very, very happy boy.I look forward to a lifetime of loving you, and learning from you.”)

शारापोव्हाचीसुध्दा ही दुसरी एंगेजमेंट आहे. यापूर्वी 2010 मध्ये तिची उंचपुरा बास्केटबाॕलपटू साशा व्हुजासीक (Sasha Vujacic) ह्याच्याशी एंगेजमेंट झाली होती पण दोन वर्षानंतर त्यांनी आपले संबंध संपवले होते. त्यानंतर गायक अॕडम लेव्हिनसोबतही शारापोव्हाचे नाव जोडले गेले होते.

शारापोव्हा ही पाच वेळची ग्रँड स्लॕम विजेती, माजी नंबर वन अतिशय लोकप्रिय टेनिस खेळाडू आहे. तिने दुखापती व फाॕर्म गेल्याच्या कारणाने यंदा फेब्रुवारीतच निवृत्ती जाहीर केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER