मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार – मुख्यमंत्री फडणवीस यांचे बारड येथे प्रतिपादन

cm fadnavis

मुदखेड/तालुका प्रतिनिधी: भोकर मतदार संघातील भाजप सेना युतीचे उमेदवार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बारड येथे झाली .याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेवर येणार म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बँकॉक या बाहेर देशात पळवून गेल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा:- राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा फायदा भाजपच्या विस्तारासाठी होईल – मुख्यमंत्री

मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी कोकणातील समुद्रात जाणारे पाणी हे महाराष्ट्रातील धरणात आणण्याचे काम भाजप सरकारानी निर्णय घेतला असुन त्याचे टेंडर सुद्धा झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

भोकर मतदार संघात येणार्‍या ईसापुर धरणाचे पाणी एक थेंब सुद्धा पळवीला जाणार नाही तसेच बापुसाहेब गोरठेकर यांना निवडून आणा याभागाचे रस्ते चकाचक करु असे जाहीर सभेत सांगितले. भाजप सरकार गेल्या पाच वर्षे सत्तेवर आल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधा कडे शब्द नाही. गरीबा साठी सात लाख घरकुल दिले असुन येणार्‍या काळात दहा हाजर लाख घर देणार आहेत असे म्हणाले, 40 लाख नागरिकांना या सरकारने आरोग्य सेवा उपलब्ध करून श्त्रक्रीया करून सेवा दिली आहे.ग्रामीण भागातील रस्ते तसेच महामार्ग रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले असुन पुढे ही चकाचक रस्ते करणार आसल्याची संकल्पना भाजप सरकार ने घेतली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे नेते नसुन ते आता विश्व चे नेते झाले आहेत असं अमेरिका राष्ट्रीय अध्यक्ष यांनी एका अंतरराष्टीय भाषणात सांगितले आहे.

या वेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की,बारड ते भोकर रस्ताचे चालू काम बंद हे अशोक चव्हाण यांनी थांबवण्याच पाप केल्या मुळे येणार्‍या जाणार्‍या वाहण धारकानां मोठा त्रास होत आहे. तसेच माजी आमदार कै.साहेबराव बापू बारडकर यांच्या छळ चव्हाण कुटुंबानी केला असुन त्यांना खरी श्रध्दांजली वाहायची असेल तर बापुसाहेब गोरठेकर यांना विजय करा असे आवाहन उपस्थित मतदारांना केले.

बापुसाहेब गोरठेकर म्हणाले की भोकर मतदार संघातील पाणी पळवणार असल्याची आफवा अशोक चव्हाण हे करत आहे तसेच ऊस उत्पादक शेतकरी यांना भीतीने सांगत फिरतात अस मत गोरठेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, माजी खासदार भास्करराव खतगावकर यांचेसह प्रमुख महायुतीचे नेते उपस्थित होते.