मराठमोळया पोरानं उडविलं पहिलं राफेल विमान; महाराष्ट्राच्या शानमध्ये मानाचा एक तुरा…

Saurabh Ambure

नांदेड/ विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्रासह मराठवाडयाच्या शान मध्ये एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. मराठी माणसाने मोदी सरकारने खरेदी केलेले राफेल हे युध्दविमान प्रथम उडविण्याचा मान हा मराठमोठया माणसाला मिळाला आहे. या बाबत वायुसेनेने ही माहिती फोटो व्दारे प्रसिध्द केली आहे.

मराठवाडयातील लातूर जिल्हयातील उदगीरचे स्क्वाड्रन लीडर सौरभ अंबुरे यांनी फ्रान्स येथे राफेल या विमानातून गगनभरारी घेत पहिला राफेल विमान उडविण्याचा मान मिळवला. सौरभने स्व.कै.कृष्णकांत कुलकर्णी यांच्यानंतर उदगीरकरांना अभिमान वाटावा असे कार्य केले आहे.

सौरभच्या या यशाची पहिली पायरी तयार करण्याचे श्रेय विद्यावर्धिनी इंग्रजी शाळेचे शिक्षक स्व.जाधव सरांनाही जाते असे या वेळी त्यांच्या मित्रपरिवारांनी प्रतिक्रिया दिली.

खुद वायुसेनेने सोबत दिलेला फोटो शेअर केला असून ज्यात क्वाड्रन लीडर सौरभ अंबुरे हे राफेल सोबत दिसत आहेत.