
मुंबई : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज (6 डिसेंबर 2020) निधन झाले आहे. रवी पटवर्धन (Ravi patwardhan) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्या अनेक भूमिकांमध्ये काम केले. रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास 150 हून अधिक नाटक तर 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या सर्वच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
रवी पटवर्धन यांनी 1974 मध्ये आरण्यक हे नाटक केले. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांची याच नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते. रवी पटवर्धन यांनी आईची सेवा करता यावी यासाठी लग्न केले नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला