
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 26 डिसेंबरपासून मेलबोर्न येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियातर्फे तडाखेबंद सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) व सीन अबॉट (Sean Abbott) खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोघेही दुखापतग्रस्त आहेत. सिडनीच्या काही भागात कोविड- 19 चा प्रकोप दिसत असल्याने न्यू साऊथ वेल्समध्ये अडकून पडण्याची भीती असल्याने या दोघांवर मेलबोर्नमध्येच उपचार सुरू आहेत पण त्यांना संघापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ते ऑस्ट्रेलियन संघाच्या बायो बबलमध्ये येऊ शकत नाही.
सिडनीच्या दुसऱ्या वन डे सामन्यात वॉर्नरच्या जांघेत दुखापत झाली होती. त्याला या सामन्यापर्यंत तंदुरुस्त होण्याची आशा होती पण अपेक्षेनुसार त्याची तब्येत सुधारली नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार हे दोघे तिसऱ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियन संघात दाखल होतील. हे दोघे सिडनी येथे सावरताना संघाच्या जैवसुरक्षा क्षेत्राच्या बाहेर होते. पण दोघेही न्यूसाउथ वेल्समधील हॉटस्पॉटच्या बाहेरच होते. पण तरी त्यांना स्थानीक आरौग्य नियमावलीनुसार 31 तारखेच्या आधी संघात दाखल होता येणार नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला