ॲडिलेड कसोटीत विराट कोहली करु शकतो हे विक्रम!

Virat Kohli

भारत (India) आणि आॕस्ट्रेलियादरम्यान (Australia) गुरुवारपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीत विराट कोहली (Virat Kohli) दोन विक्रम करु शकतो. हे विक्रम करताना तो ब्रायन लारा (Brian Lara) व सचिन तेंडूलकरसारख्या (Sachin Tendulkar) दिग्गजांना मागे टाकणार आहे.

अॕडिलेड ओव्हल मैदानावर सर्वाधिक धावा करणारा तो परदेशी फलंदाज ठरू शकतो. हा विक्रम सध्या ब्रायन लाराच्या नावावर आहे. तर सचिन तेंडूलकरच्या आॕस्ट्रेलियातील शतकांचा विक्रम तो मागे टाकू शकतो.

सध्या लाराच्या नावावर अॕडिलेड ओव्हलवर 610 धावा आहे. आता लारा त्याच्यापेक्षा 179 धावांनी मागे आहे. मात्र कोहलीकडे दोन डाव आहेत.

लाराने अॕडिलेडवर चार सामन्यात दोन शतकं आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याने 76.25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कोहलीने 71.83 च्या सरासरीने 431 धावा केल्या आहेत ज्यात तीन शतकांचा समावेश आहे.

आॕस्ट्रेलियाविरुध्द आॕस्ट्रेलियात कसोटी शतकांच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आघाडीवर आहे. त्याने आॕस्ट्रेलियातील 20 कसोटी सामन्यांमध्ये सहा वेळा शतके केली आहेत. आॕस्ट्रेलियात सचिनने 53.2 च्या सरासरीने 1809 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावरही 12 कसोटी सामन्यात 6 कसोटी शतके आहेत. त्याच्या नावावर 55.39 च्या सरासरीने 1274 धावा आहेत. त्यामुळे आता त्याने शतक केले तर तो सचिनच्या पुढे जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER