
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket team) नीचांकी धावसंख्येबाबत (Lowest Scores) एक गमतीशीर बाब समोर आली आहे. ती म्हणजे सामना जेवढा झटपट तेवढी भारताची नीचांकी धावसंख्या मोठी आहे आणि सामना जेवढा दीर्घ तेवढी भारताची नीचांकी धावसंख्या छोटी आहे.
कसोटी सामने जे पाच दिवसांचे खेळले जातात त्यात भारतीय संघाने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॕडिलेड कसोटीत ३६ धावांचा नीचांक गाठला; मात्र याच भारतीय संघाची टी-२० सामन्यांमध्ये नीचांकी धावसंख्या ७४ धावांची आहे जी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच २००८ साली मेलबोर्न येथे नोंदवली होती. या दोघांच्या दरम्यान वन डे सामने जे प्रत्येकी ५० षटकांचे होतात, त्यात भारताची नीचांकी धावसंख्यासुद्धा या दोघांच्या दरम्यान ५४ धावांची आहे.
शारजा येथे २००० साली श्रीलंकन संघाने भारताचा डाव ५४ धावांत संपवला होता. या प्रकारे भारताच्या नीचांकी धावसंख्या या जेवढा सामना मोठा तेवढ्या छोट्या आणि जेवढा सामना छोटा तेवढ्या मोठ्या आहेत.
भारताच्या नीचांकी धावा
- कसोटी- ३६ वि. ऑस्ट्रेलिया, अॕडिलेड, २०२०
- वन डे- ५४ वि. श्रीलंका, शारजा, २०००
- टी-२० – ७४ वि. ऑस्ट्रेलिया, मेलबोर्न, २००८
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला