मनोरंजक कहाणी जॉन रिड नावाच्या दोन क्रिकेटपटूंची!

John R. Reid-John R. Reid

2020 हे विचित्र वर्ष आहे. यंदा फार विचित्र गोष्टी घडत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात दोन खेळाडू होते जॉन रिड नावाचे. दोघेही न्यूझीलंडचे (New Zealand). सिनियर जॉन रिचर्ड रिड (John R. Reid) आणि ज्युनियर जॉन फुल्टन रिड (John F. Reid) योगायोग पहा, या दोन्ही रिडचे यंदाच निधन झाले. जॉन एफ. रिड यांनी 29 डिसेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला तर जॉन आर. रिड यांनी अडीच महिन्यांपूर्वी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे 2020 च्या आरंभी दोन-दोन जॉन रिड असणाऱ्या क्रिकेट जगतात आता एकही जॉन रिड नाही.

सिनियर जॉन रिड हे 1949 ते 1965 दरम्यान 58 कसोटी सामने खेळले. न्यूझीलंडसाठी मायदेशात व परदेशात कसोटी सामना जिंकणारे ते पहिले कर्णधार होते.दक्षिण ध्रुवावर खेळल्या गेलेल्या पहिल्या क्रिकेट सामन्यातही ते खेळले होते आणि त्यांनी लगावलेल्या षटकारावर चेंडू बर्फात हरवल्याने सामना संपला होता. दक्षिण ध्रुवावर हा सामना खेळला गेल्याने त्यांनी मारलेला प्रत्येक फटका उत्तरेकडेच होता. 1975 ते 78 दरम्यान ते न्यूझीलंड क्रिकेटचे निवडकर्ते होते. 1993 ते 2002 दरम्यान ते मॕच रेफ्री होते. कठोर रेफ्री म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होती. न्यूझीलंडचे ते सर्वाधिक आयुष्य लाभलेले कसोटीपटू होते. त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी यंदा 14 ऑक्टोबरला ऑकलंड येथे निधन झाले.

जॉन फुल्टन रिड यांचे नुकतेच 64 वर्षे वयात मंगळवार, 29 रोजी निधन झाले. सिनियर रिड उजव्या हाताने खेळणारे तर हे डावखुरे. जॉन एफ. रिड यांनी 1979 ते 1986 दरम्यान 19 कसोटी आणि 25 वन डे सामने खेळले होते. ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज ब्रुस रिडचे हे चुलत बंधू. ह्या रिडच्या नावावर कसोटी सामन्यांच्या दोन डावातील फलंदाजी सरासरीत सर्वाधिक फरकाचा विक्रम आहे. जॉन एफ. ची कसोटी सामन्यांच्या पहिल्या डावातील सरासरी 68.41 अशी भक्कम आहे पण दुसऱ्या डावातील सरासरी फक्त 12.09 धावांची आहे. हा जो 56 धावांच्या सरासरीचा फरक आहे तो विक्रमी आहे.

निवृत्तीनंतर त्यांनी न्यूझीलंड क्रिकेटसाठी ऑपरेशन्स डायरेक्टर आणि हाय परफॉर्मन्स मॅनेजरची भूमिका बजावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER