
आॕस्ट्रेलियाविरुध्दच्या अॕडिलेड कसोटीत दोन्ही डावात पृथ्वी शॉच्या अपयशामुळे क्रिकेटप्रेमींची मोठी नाराजी आहे. शॉचे तंत्र व पदलालित्य सदोष असल्याचे आणि तो फटके खेळायची घाई करत असल्याचे बहुतेक माजी क्रिकेटपटूंचे मत आहे.ज्यांच्या नावाने ही मालिका खेळली जाते त्या अॕलन बोर्डर व सुनील गावसकर यांनीसुध्दा भारताने या सामन्यात शॉपेक्षा शुभमान गीलला खेळवायला हवे होते असेच मत व्यक्त केले होते पण भारताने पृथ्वीला खेळवले आणि तो फक्त 0 व 4 धावा काढून बाद झाला आणि मयांक अगरवालसोबत दोन्ही डावात सलामीसुध्दा 0 व 7 धावांचीच मिळाली. परिणामी खराब सुरुवातीअंती भारताने सामनासुध्दा गमावला. पृथ्वी शॉ व मयंक अगरवाल जोडी पुन्हा एकदा अपयशी ठरली.
योगायोगाने शॉ व अगरवाल यांनी ज्या ज्या वेळी भारतीय डावाची सुरुवात केली ते कसोटी सामने असो वा वन डे सामने, भारताने गमावलेच आहेत.
यात तीन कसोटी व तीन वन डे सामने आहेत. हे सामने व त्यात पृथ्वी शाॕ व मयंक अगरवालच्या धावा आणि भागिदारी पुढीलप्रमाणे..
1) अॕडिलेड कसोटी- पराभव
पृथ्वी शाॕ- 0 व 4
आगरवाल- 17 व 9
भागिदारी- 0 व 7
2) ख्राईस्टचर्च कसोटी- पराभव
पृथ्वी शाॕ- 64 व 14
आगरवाल- 7 व 3
भागिदारी- 30 व 8
3) वेलिंग्टन कसोटी- पराभव
पृथ्वी शाॕ- 16 व 14
आगरवाल- 34 व 58
भागिदारी- 16’व 27
4) मोंगानुई वन डे- पराभव
पृथ्वी शाॕ- 40
आगरवाल- 1
भागिदारी- 8
5) आॕकलंड वन डे- पराभव
पृथ्वी शाॕ- 24
आगरवाल- 3
भागिदारी- 21
6) हॕमिल्टन वन डे- पराभव
पृथ्वी शाॕ- 20
आगरवाल- 32
भागिदारी- 50
याप्रकारे शाॕ व अगरवाल जोडीने गेल्या सहा सामन्यात केवळ एकच अर्धशतकी सलामी दिली असून हे सर्व सामने भारताने गमावले आहेत. आतापर्यंत यशस्वी जोड्या व त्यांच्या भागिदारींची चर्चा व्हायची पण पृथ्वी शॉ व मयंक अगरवाल यांच्यामुळे अपयशाची चर्चा होत आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला