IND vs AUS : कोविड -१९ च्या वाढत्या प्रकरणांमुळे कसोटी मालिकेत नाही होणार कोणतेच बदलावं, CA ने दिले मोठे विधान

Corona & CA

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या कसोटीच्या ठिकाणी होणा-या बदलांविषयी बरेचसे अटकळ बांधले जात होते. सिडनी क्रिकेट मैदान अजूनही त्यांची पहिली पसंती असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.

सिडनी येथे कोविड -१९ च्या प्रकरणात वाढ झाल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या ठिकाणी बदल होत असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे स्पष्ट केले की सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG) अद्याप तिसऱ्या कसोटी सामन्यांसाठी पहिली पसंती आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे तर शेवटचा सामना ब्रिस्बेनमध्ये १५ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.

सिडनीच्या उत्तर किनारपट्टीवर विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट अधिकाऱ्यांना सतर्क केले गेले. रिपोर्ट्सनुसार, ‘सिडनी आणि ब्रिस्बेन दरम्यान तिसरा आणि चौथा कसोटी सामन्याची स्वॅपिंग हा सर्वात वरचा पर्याय आहे. असे झाल्यास मालिकेचा चौथा कसोटी सामना सिडनी येथे १५ ते १९ जानेवारी दरम्यान खेळला जाईल.’

परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉकले म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी येथे होईल अशी अपेक्षा आहे. “आम्ही वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही आणि सिडनी क्रिकेट मैदानावरील (तिसरा) सामना ही आमची पहिली पसंती आहे,” हॉक्ले यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

ते म्हणाले, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या अतिशय आव्हानात्मक वेळी सामन्यांचे आयोजन करण्यासाठी एक सशक्त यंत्रणा तयार केली आहे, आम्ही आमची जैव सुरक्षा टीम, सरकारे, प्रांतीय आणि प्रादेशिक संघटना, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर असोसिएशन, आमचे भागीदार आणि वेणुझच्या अधिकाऱ्यांशी योग्य निर्णय घेत राहू.’

कोविड -१९ च्या वाढत्या प्रकरणांमुळे दुखापतीतून सावरलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज सीन एबोट दोघेही सिडनीहून मेलबर्नला गेले आहेत, जेथे बॉक्सिंग डे कसोटी सामना (दुसरा कसोटी) २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. अहवालानुसार दुसरी कसोटी तसेच तिसरा कसोटी सामनाही मेलबर्नमध्ये घेण्यात येऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER