नेतृत्वानंतर फलंदाजीतही अजिंक्य रहाणेने जिंकली मने

Ajinkya Rahane

‘संधीचे सोने करणे’ या म्हणीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India Vs Australia) मेलबोर्न कसोटीतील (Melbourne Test) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) खेळाचे उदाहरण द्यायला हवे. पहिल्या दिवशी त्याने आपल्या नेतृत्वातील कल्पकतेने सर्वांना प्रभावित केले आणि आज आपल्या शानदार फलंदाजीने मने जिंकली. कर्णधाराची खेळी करत दिवसअखेर तो १०४ धावांवर नाबाद परतलाय आणि भारताला दुसऱ्या दिवसअखेर ८२ धावांची आघाडी मिळालीय. अद्याप रहाणे व जडेजा (Ravindra Jadeja) या नाबाद जोडीसह पाच गडी हाताशी आहेत.

त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारताची स्थिती भक्कम दिसतेय. रहाणेने २०० चेंडूंच्या खेळीत १२ चौकार लगावताना पाॕईंटकडून लगावलेल्या चौकारावरच आपले शतक साजरे केले आहे. जडेजासोबतच्या भागीदारीसह त्याने धारदार मानला जाणारा ऑस्ट्रेलियन मारा बोथट ठरवला आहे. रोखठोक बोलणाऱ्या बिशनसिंग बेदी यांनी अजिंक्यच्या मन जिंकणाऱ्या खेळीचे कौतुक कराताना म्हटलेय की, ‘फाॕर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट’ याची पुन्हा एकदा खात्री पटलीय. मुंबईच्या खडूस बॕटींग स्कूलची अनुभूती पुन्हा आली. अॕडीलेड कसोटीतील पराभवाचे अपयश पुसून काढायचे डोंगराएवढे काम भारतीय संघासमोर असले तरी कसोटी क्रिकेटमध्येच खरी मजा आहे हे पुन्हा दिसून आले आहे.’

रहाणेने या शतकी खेळीदरम्यान बरेच विक्रम केले आहेत. १९९९ नंतर मेलबोर्नवर शतक करणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरलाय. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने १९९९ मध्ये एमसीजीवर शतक केले होते. ऑस्ट्रेलियात शतकं करणाऱ्या भारतीय कर्णधारांची यादी आता अझहर (१) , तेंडुलकर (१), गांगुली (१) , कोहली (४) आणि रहाणे (१) अशी बनली आहे. रहाणेचे परदेशातील हे आठवे तर मेलबोर्नवरील दुसरे कसोटी शतक आहे. ऑस्ट्रेलियातील आपली दोन्ही शतके त्याने मेलबोर्नलाच केली आहेत. रहाणेच्या खेळीचे कौतुक यासाठी करायचे की त्याने लागोपाठ तीन अर्धशतकी भागीदारी करून भारतीय धावसंख्येला आकार दिला आहे. चौथ्या विकेटसाठी विहारीसोबत ५२ धावा, पाचव्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसोबत ५७ धावा आणि सहाव्या गड्यासाठी जडेजासोबत त्याची नाबाद १०४ धावांची भागीदारी आहे.

त्यामुळेच भारताला ५ बाद २७७ अशी मजल मारता आली आहे. सहा वर्षांपूर्वी त्याने मेलबोर्नलाच जे शतक (१४७) केले होते त्यापेक्षा आताचे शतक अधिक दमदार म्हणायला हवे; कारण या वेळचा ऑस्ट्रेलियन मारा अधिक जानदार आहे. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगलोर कसोटीतही त्याने ५२ धावांची उपयुक्त खेळी केली होती. ही खेळी तो अजूनही आपली सर्वोत्तम खेळी मानतो. पण आजची त्याची ही खेळी त्यापेक्षाही चांगली असल्याची क्रिकेट पंडितांमध्ये चर्चा आहे. याशिवाय २०१४ च्या लाॕर्डस कसोटीतील १०३ धावा आणि २०१३ च्या डरबन कसोटीतील त्याच्या ९६ धावांच्या खेळीसह दर्जेदार मानल्या जातात. पंडितांनी त्याच्या आजच्या खेळीला याच श्रेणीत ठेवले आहे आणि त्याचे संघातील स्थान निश्चित का मानले जात नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

सध्याच्या मालिकेत ही खेळी निर्णायक ठरेल असे मानले जात आहे. या खेळीत अतिशय तीक्ष्ण नजर, अभेद्य तंत्र आणि खराब चेंडूंचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. अॕडिलेड कसोटीत कोहलीला धावबाद होण्यात झालेली टीका आणि दुसऱ्या डावातील भोपळ्यानंतर अजिंक्यवर दडपण तर वाढलेलेच होते; शिवाय कोहलीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली. अशा स्थितीत कर्णधार म्हणूनही आणि फलंदाज म्हणूनही त्याने छाप सोडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER