‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ :मनसेच्या दणक्यानंतर अ‍ॅमेझॉन सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

अॅमेझॉन मनसेसोबत चर्चा करणार, स्वतःहून दिला प्रस्ताव

Raj Thackeray-Amazon

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मुंबई आणि पुण्यात खळखट्याकचा सपाटा लावल्यानंतर अ‍ॅमेझॉनने (Amazon) नमते घेतले आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.

अ‌ॅमेझॉनकडून मनसेला तसे कळवण्यात आले आहे. मात्र, आता अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे.

मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर अॅमेझॉन आज मनसेसोबत चर्चा करणार आहे, Amazonकडून स्वत:हून चर्चेचा प्रस्ताव आला आहे.

अॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्यायदेखील ठेवावा अशी आग्रही मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतरही अॅमेझॉन कडून मराठीसाठी काही प्रयत्न झाल्याचे दिसले नाही त्यानंतर मनसेने खळ्ळखट्याक करून अॅमेझॉनला पुन्हा मराठीची आठवण करून दिली. अखेर अॅमेझॉनने आता स्वतःहून चर्चेचा प्रस्ताव दिला व आज ते मनसेसोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अ‍ॅमेझॉन कडून नोटीस आल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

राज ठाकरेंना नोटीस –

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.
अ‍ॅमेझॉन – मनसेमधील वाद –

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.

ही बातमी पण वाचा : अॅमेझॉनला वठणीवर आणलं आता शाळांची बारी ; “फीमध्ये सवलत न दिल्यास २०० पालकांसह मनसे दाखवणार हिसका”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER