अ‌ॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही माफी मागायला हवी ; मनसे नेत्याचा आक्रमक पवित्रा

मुंबई :- अ‌ॅमेझॉनवर (Amazon) मराठी भाषेचा अंतर्भाव करण्यासाठी मनसेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापार्श्वभूमीवर अ‌ॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही माफी मागायला हवी, अशी भूमिका मनसेने घेतली असून आज मनसे नेते आणि अ‌ॅमेझॉन व्यवस्थापनातील अधिकारी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा होणार असल्याचे कळते.

ही बातमी पण वाचा:- ‘मराठी नाय तर अ‍ॅमेझॉन नाय’ :मनसेच्या दणक्यानंतर अ‍ॅमेझॉन सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

मनसैनिकांनी पुणे आणि मुंबईत अ‌ॅमेझॉनचे कार्यालय व वेअरहाऊसची तोडफोड केली. त्यामुळे अ‌ॅमेझॉन ने हा विषय अधिक न वाढवता मनसेची मागणी मान्य करण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे.अ‌ॅमे झॉनची वेबसाइट व मोबाइल अ‌ॅपवर येत्या सात दिवसांत मराठी झळकणार असून तसे आश्वासन अ‌ॅमेझॉनने दिल्याचे मनसे नेते सांगत आहेत.

दरम्यान मराठीवरून मनसे आणि अ‌ॅमेझॉन कंपनी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. अ‌ॅमेझॉन वर इतर भाषांप्रमाणे मराठी भाषेलाही स्थान असायला हवे, अशी मागणी मनसेने केली आहे. त्यातूनच ‘नो मराठी, नो अ‌ॅमेझॉन , असे फलक मुंबईत सर्वत्र लावत मनसेने जोरदार मोहीमही उघडली आहे. दुसरीकडे अ‌ॅमेझॉनच्या अनेक फलकांनाही मनसेने लक्ष्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER