महाराष्ट्रात मराठीचा आग्रह संविधानविरोधी- रामदास आठवले

Ramdas Athawale.jpg

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातदेखील मराठीतच बोला अशी सक्ती करणे संविधानविरोधी आहे. असे रिंपाइंचे (RPI) अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) म्हटले आहे. लेखिका शोभा देशपांडे (Shobha Deshpande) यांनी मराठीत बोलण्यासाठी एका ज्वेलर्सला आग्रह धरला होता. हे प्रकरण चांगलेच तापले.

शोभा देशपांडे यांनी १२ तासांहून अधिक काळ कुलाब्यातील महावीर ज्वेलर्सच्या दुकानासमोर आंदोलन केले. दुकानदाराच्या आडमुठेपणाविरुद्ध शोभा देशपांडेंनी रात्रभर ठिय्या मांडल्यानंतर सकाळी आंदोलनस्थळी मनसेने एन्ट्री केली. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्या सराफा दुकानदाराला चांगलाच चोप दिला. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लेखिका शोभा देशपांडे यांच्या मताशी सहमत नसल्याचं सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली भाषा बोलण्याचा अधिकार आहे. लेखिका शोभा देशपांडे यांच्या मतांशी सहमत नाही, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER