मराठीनेच दिली अभिनयाची संधी

Chinmayi Sumit

लाभले आम्हास भाग्य…बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ही मराठी गौरवगीतातील ओळ फक्त गुणगुणण्यापुरतीच नाही तर खरच उत्तम मराठी बोलता येत असेल तर आपल्या आवडीचं करिअर घडू शकतं हे सांगणारी एक कमाल गोष्ट आहे असं आम्ही इथे लिहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हो हे अगदीच खरं आहे. अभिनेत्री चिन्मयी सुमित ( Chinmayi Sumit) आज आपल्याला मालिका, नाटक, सिनेमा यामध्ये दिसत आहे आणि तिच्या संवादफेकीतून लक्ष वेधून घेत आहे त्याचे कारण तिच्या स्पष्ट उच्चार असलेल्या मराठीप्रेमाशी जोडलेले आहे.

आजकाल दहा शब्दांच्या ओळीत नऊ शब्द इंग्रजी, हिंदी किंवा या दोन्ही भाषांची मिसळ असते. शुद्ध मराठी (Marathi)ऐकायला मिळणं म्हणजे कानांसाठी पर्वणीच. त्यामुळेच जेव्हा चिन्मयी सांगते, कि मला अभिनय येतो म्हणून नव्हे तर मी चांगलं, स्पष्ट मराठी बोलते म्हणून मला नाटकात घ्या असं कॉलेजच्या नाट्य हॉलमध्ये आमचं नाटक बसवणारा मुलगा म्हणाला होता. मी अभिनय करेन याचा कुठेही थांगपत्ता नसताना माझ्या मराठी बोलण्यानेच मला अभिनेत्री ही ओळख मिळाली.

Sumeet Raghavan Wife Chinmayee Surve Files Complain Against Who Misbehaved With His Wife - एक्ट्रेस को देख दिनदहाड़े अश्लीलता करने लगा था शख्स, Bmw में बैठे उस आरोपी की पूरी सच्चाई आईगायक, अभिनेता, निवेदक सुमित राघवन (Sumeet Raghvan) याच्यासोबत लग्न करून अभिनयातच रमलेल्या चिन्मयीच्या आसपासही अभिययात करिअर करण्याचा विचार फिरकलेला नव्हता. मग असं काय झालं की मराठीची उत्तम जाण आणि स्पष्ट उच्चार हीच तिला अभिनयाकडे नेणारी वाट बनली. चिन्मयीचे बालपण औरंगाबाद मध्ये गेले. साधारण ७० च्या दशकाचा तो काळ असल्याने मनोरंजनासाठी टीव्ही नव्हे तर रेडिओ होता. चिन्मयीला लहानपणापासूनच शुद्ध मराठी बोलायला खूप आवडायचं. आपण मोठेपणी भाषणं करतोय अशी स्वप्नंही तिने शालेयवयात पाहिली आहेत. पुढे दहावी अकरावीत असताना चिन्मयी आकाशवाणीवर श्रृतिकांसाठी आवाज द्यायची. आपली भाषा चांगली आहे इतकं तिला कळलं होतं. पुढे कॉलेजमध्ये असताना एक नाटक बसवायचं सुरू होतं. तिथे चिन्मयी सहज गेली आणि नाटक बसवणाऱ्या टीमसोबत गप्पा मारायला लागली. तेव्हा चिन्मयीची स्वच्छ भाषा, बोलण्याची पद्धत ऐकून तिला नाटकात काम करण्याची ऑफर आली. पण अभिनयाचं काय हा प्रश्न तिला पडलाच तरीही चिन्मयीने पाण्यात उडी घेतली आणि मराठी भाषेच्या प्रेमापोटी तरलीही.

चिन्मयी सध्या जीव झाला येडा पिसा या मालिकेत आत्याबाई हा आमदारीण बाईची भूमिका करताना दिसत आहे. या मालिकेतील चिन्मयीच्या लूकचीही खूप चर्चा आहे. मोजके पण नेटके काम करण्यावर भर देणाऱ्या चिन्मयीने खरंतर उमेदीची वर्षे मुलांच्या संगोपनासाठी दिली. ती सांगते, सुमितही त्याच्या नाटक, मालिकांमध्ये गुंतला होता आणि मला माझ्या मुलांच्या वाढीचे टप्पे अनुभवायचे होते. त्यामुळेच चिन्मयी मधली काही वर्षे छोट्या, मोठ्या पडदयापासून काहीशी लांब होती. ज्वालामुखी या नाटकाच्या निमित्ताने चिन्मयी आणि सुमितची भेट झाली. कोण प्रपोज करणार याची वाट बघण्यातच पहिली काही वर्षे अशीच नुसती फिरण्यात गेली आणि शेवटी कुणीच कुणाला प्रपोज न करता काय कळायचे ते दोघांनाही कळले. सुमितच्या गाण्याचा सूर पक्का आहे तर चिन्मयी सहजसुंदर बोलण्यालाही एक ताल आहे. कधीतरी सहज म्हणून कॉलेजच्या नाटकाची तालीम बघायला आलेली एक मुलगी, तिचे मराठी बोलणे ऐकून तिला नाटकात काम करण्याची संधी मिळते आणि मग वक्तृत्वात करिअर करण्याची स्वप्नं पाहणारी चिन्मयी अभिनयक्षेत्रात येते असा तिचा प्रवास एकदम हटके आहे.

ही बातमी पण वाचा : कोरोना गॉन…कॅमेरा ऑन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER