नोएडाच्या फिल्मसिटीत मराठी- इंग्रजी सिनेमेही बनतील – राजू श्रीवास्तव

Yogi Adityanath - CM Uddhav Thackeray - Raju Srivastav

लखनौ : नोएडाच्या प्रस्तावित फिल्मसिटीत आम्ही एवढ्या चांगल्या सोई देऊ की येथे हिंदीच नाही तर मराठी-इंग्रजी सिनेमेदेखील बनविले जातील, असे उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांनी सांगितले. ते उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेच्या पहिल्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

श्रीवास्तव म्हणाले की, फिल्मसिटी किंवा बॉलिवूड ही काही वस्तू नाही जी कोणी इकडची तिकडे उचलून नेईल. आम्ही कोणाच्या तुलनेत फिल्मसिटी उभारणार नाही. चांगली फिल्मसिटी बनविणार आहोत. यामुळे लोकांना रोजगार मिळेल. आम्ही एवढ्या चांगल्या सोई देऊ की हिंदीच नाही तर मराठी – इंग्रजी सिनेमेदेखील इथेच बनविले जातील.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, जेव्हापासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यात फिल्मसिटी उभारण्याची घोषणा केली तेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठकरे याला बॉलीवूडला आव्हान मानून ‘मुंबईची फिल्मसिटी पळवून दाखवा’, असे आव्हान देत आहे. यामुळे राजकारण तापले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेवर टीका करताना राजू श्रीवास्तव म्हणाले, फिल्मसिटी किंवा बॉलिवूड ही काही वस्तू नाही जे कोणी एकडचे तिकडे उचलून नेईल. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) वक्तव्य आव्हान कमी आणि राजकारण जास्त वाटते. त्यांना कदाचित् योगी आदित्यनाथांची काम करण्याची पद्धत माहिती नाही. योगीनी एकदा मनावर घेतले तर ते काम पूर्ण करूनच सोडतात. उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटीसाठी ग्रेटर नोएडामध्ये जागा घेण्यात आली आहे. इतर कामे सुरु आहेत. लवकरच इथे फिल्मसिटी उभारलेली दिसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER