‘…तो आनंद सापडेल’; राज ठाकरेंनी नव्या मालिकेसाठी केदार शिंदेंना दिल्या शुभेच्छा

Kedar Shinde-Raj Thackeray

मुंबई : मराठी कलाकारांच्या मागे कायमच खंबीरपणे उभं राहणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नव्या मालिकेविषयी भाष्य केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या ट्विटरवर या नव्या मालिकेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोनाचे सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या ‘सुखी माणसाचा सदरा’ या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असे मनापासून वाटते , असे राज ठाकरे म्हणाले. या ट्विटसोबतच त्यांनी अन्य दोन ट्विटदेखील केले आहेत.

भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेले पाहून छान वाटले . या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा ‘सुखी माणसाचा सदरा’ रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना या अनिश्चिततेतून ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल…, असेही राज ठाकरे म्हणाले.

 

;

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER