मराठी भाषादिन : राज ठाकरेंचा ‘जादूचा प्रयोग’ ! मनसे पदाधिकारी झाले चकित

मुंबई :- सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त या कवीच्या सन्मानार्थ दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठीचा गौरव व्हावा, या प्रतिकात्मक अर्थाने हा दिवस साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेदेखील प्रारंभापासून मराठीच्या उपयोगासाठी अत्यंत आग्रही राहिली आहे. त्यामुळेच आज गुरुवारी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांना आणि कार्यकर्त्यांना एक आगळीवेगळी भेट दिली!

जेव्हा खासदार संभाजीराजेंना प्रवेशद्वारावर रोखतात….

ही भेट म्हणजे चहा-कॉफी घेण्याचा मग्गा (मग) आहे, मात्र तो साधासुधा नसून, जादुचा आहे! यामध्ये गरम पाणी, चहा, कॉफी ओतले की, त्यावर काही क्षणांनी चक्क मनसेचा झेंडा उमटतो. राज ठाकरे यांनी आज आपल्या निवासस्थानी मनसेचे पदाधिकारी बाळा नांदगावकर, शिरीष सावंत यांना बोलविले. ते येताच राज ठाकरे यांनी त्यांना हा ‘जादुचा प्रयोग’ करून दाखविला. हे बघून ते चाटच पडले. या अनोख्या भेटीबाबत आज एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, मराठी भाषा दिनाला अशी भेट राज ठाकरे यांच्याकडून मिळणे ही गौरवाची गोष्ट आहे. मी तर, प्रेमातच पडलो आहे. घरी गेल्यावरही हा प्रयोग करणार आहे. राज ठाकरे हे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही ही भेट देणार अहेत.

यावेळी नांदगावकर यांनी माध्यमप्रतिनिधीस या प्रयोगाचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. काळ्या रंगाच्या मग्ग्यामध्ये गरम पाणी ओतताच, त्यावर राजमुद्रा अंकित असलेला मनसेचा झेंडा उमटला! तापमानबदलाच्या तत्वावर ही संकल्पना आधारलेली आहे, हे येथे उल्लेखनीय.


Web Title : Marathi Divas : Raj Thackeray presents unique gift to party workers

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)