मराठी चॅनेलच्या मालकाला ‘टीआरपी’ घोटाळ्यात जामीन

TRP Scam -Court

मुंबई: टीव्ही वाहिन्यांची दर्शकसंख्या ठरविण्यासाठी केल्या जाणाºया सर्वेक्षणात (TRP) घोटाळा केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केलेले ‘फक्त मराठी’ या वृत्तवाहिनीचे मालक शिरीष पतनशेट्टी यांना येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला.

पुराव्यांमध्ये ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांना न धमकावणे व मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून कोणताही गुन्हा न करण्याच्या अटीवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश चित्रे यांनी शेट्टी यांना ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

‘फक्त मराठी’ने आपला ‘टीआरपी’ वाढवून घेण्यासाठी पैसे दिले, असा पोलिसांचा आरोप आहे. परंतु तो विनबुडाचा व निखालस खोटा असल्याचे सांगून शेट्टी यांच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, या प्रकरणात ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी कोणालाही पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. कारण हा चॅनेल सशुल्क नसून ‘फ्री टू एअर’ म्हणजे कोणालाही विनामूल्य पाहता येईल असा आाहे. शिवाय पोलीस म्हणतात त्या काळात या चॅनेलचा ‘टीआरपी’ किंवा त्यांचे उत्पन्न अचानक वाढल्याचेही उपलब्ध आकडेवारीवरून दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER