
दिनचर्या चांगली असावी किंवा जीवनपद्धती योग्य असली की शरीर स्वस्थ राहते हे सांगणे प्रत्येकाला नवीन नाही. बरेचजण काटेकोरपणे व्यायामादि नियम पालन करणारे असतात तर काहीजण वाचून फक्त समजून घेतात. स्वास्थ्य रक्षणार्थ योग्य दिनचर्या करणे किती उपयोगी आहे हे आयुर्वेदात (Ayurveda) त्याच्या लाभासह लिहिले आहे.
त्याविषयी या लेखात जाणून घेऊया –
- नित्य अंजन – सौवीरांजन ( केमिकल विरहित) अंजन केल्याने डोळ्यातील मळ निघतो. दृष्टी चांगली राहते. नेत्र स्वास्थ्य, रक्षणार्थ.
- नस्य – नाकात अणुतेल सोडणे. शिरोरोग ज्ञानेंद्रियांचे संरक्षण, केसांचे आरोग्य टिकणे.
- तोंड जीभ लाळ स्वच्छ राहण्याकरीता जायफळ लवंग तांबूलपत्र कर्पूर विलायची युक्त तांबूल सेवन.
- सकाळ संध्याकाळ दात काडीने स्वच्छ करणे – दंत स्वास्थ्याकरीता.
- तेलाने गुळण्या – हनु, स्वर, भूक, रसज्ञान चांगले होण्याकरीता. दाताचे विकार, ओठ फाटणे, कण्ठरोग बरे होण्याकरीता उपयोगी.
- केसांना तेल लावणे – डोकेदुखी, केसांचे विकार न होण्याकरीता. शिरःभाग, केस दृढ होण्याकरीता.
- कर्णपूरण – कानात तेल टाकल्याने बाधिर्य येत नाही. मान जकडणे, हनुसंधि जकडणे होत नाही.
- अभ्यंग – मालीश – व्यायाम – पुष्टी दायक, अभिघात किंवा परीश्रमाचे काम केल्यास त्रास न होणे. मृदुता, तारुण्य टिकविणारे.
- पादाभ्यंग – रोज पायाला तेल लावणे. पाय रुक्ष सुप्त न होणे. थकवा दूर होणे. पायात स्थिरता ताकद राहणे. नेत्र ज्योति वाढणे.
- उटणे लावून स्नान – दुर्गंधी थकवा जडपणा आळस घाम त्वचा विकार दूर होणे. भूक, पवित्रता, कामशक्ति वाढते.
- सुगंधी फुलांची माला – प्रसन्नता, शरीर पुष्टी उत्साह वाढविणारे.
- बाहेर निघतांना पादत्राणे छत्री यांचा वापर – नेत्रशक्ति वाढणे, पायाला इजा न होणे, बाह्य प्रदुषणापासून संरक्षण.
- नख केश श्मश्रुचे वेळेत कर्तन – चक्षुशक्ति वाढणे, रूप शोभा वाढणे, कामशक्ति वाढणे.
- भूक असेल तेवढेच जेवणे. जाठराग्निचा विचार करून जेवणे. – योग्य पाचन व शरीराचे पोषण चांगले होण्याकरीता गरजेचे.
दिनचर्येचे हे नियम पाळल्यास शरीर स्वस्थ राहण्याकरीता नक्कीच मदत होते. या गोष्टींना वेळही तेवढा लागत नाही. पण नियमाने केले तर स्वतःला चांगला परीणाम मात्र नक्कीच जाणवतो.
- विहार म्हणजे नक्की काय ?
- आयुर्वेदात वर्णित आहाराचे प्रकार
- आहारावरील संस्कार, त्याचे शरीरावर परिणाम !
- शास्रोक्त भोजन विधी म्हणजे काय ?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला