अभिनेत्री प्रिया बेर्डें ७ जुलैला करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Priya Berde - NCP

मुंबई : अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ७ जुलै रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. या वृत्ताला प्रिया बेर्डे यांनी दुजोरा दिला आहे.

प्रिया बेर्डे राष्ट्रवादीमधून करणार राजकीय करिअरची सुरूवात

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मला चित्रपटसृष्टीत पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करता येईल, त्यामुळे मी येत्या ७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश करणार आहे. तुमचा आशीर्वादाची गरज आहे”, असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

दरम्यान, ७ जुलै रोजी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार माहिती आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER