विखुरलेल्या मराठ्यांनो एकत्र या : शाहू महाराज

कोल्हापूर : विखुरलेल्या मराठ्यांनो एकत्र या. आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात असून ती जिंकण्यासाठी एकीचे बळ दाखवा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर येथे सकल मराठा समाजाच्या (Sakal Marathas) मेळाव्यात केले.

मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सकल मराठा समाज संघटनेच्या वतीने कोल्हापुरात मेळावा घेण्यात आला. यावेळी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकण्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करावा, अन्यथा मराठ्यांची ताकद दिल्लीत दाखवू असा इशारा सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला.

२९ ऑक्टोबरला पुण्यात पुढील आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याचा निर्धारही करण्यात आला. या मेळाव्यास श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) उपस्थित होते.

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, मराठा समाज विविध पक्षात विखुरलेला आहे. काही काँग्रेस, काही राष्ट्रवादी तर काही शिवसेना व भाजपमध्येही आहेत. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष बाजूला ठेवत मराठा समाजाने राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊन नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. आपल्याला सर्वोच्च न्यायालयातील दावा जिंकायचा आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारची ताकद आपल्या पाठिशी असणे आवश्यक आहे. हीच ताकद सोबत नसेल तर लढा यशस्वी होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकार मराठ्यांच्या बाजूने आहे का ? हे तपासून पाहण्याची गरज आहे. आपली ताकद आपल्यासाठी वापरा.

यावेळी आमदार प्रकाश आवाडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, प्रताप माने, सर्जेराव पवार, लालासाहेब गायकवाड, राजवर्धन निंबाळकर, कमलाकर जगदाळे यांच्यासह अनेकांनी आपली भूमिका मांडली.

ही बातमी पण वाचा : संभाजी राजेंच्या आंदोलनाची अजित पवारांकडून तात्काळ दखल, ‘सारथी’ ला पुन्हा स्वायत्तता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER