आरक्षण : मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करा – मराठा सेवा संघ

मराठा सेवा संघ - पुरुषोत्तम खेडेकर

मुंबई :- आरक्षणात मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसी (OBC) (इतर मागास्वर्गीयां) मध्ये समाविष्ट करा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangh) संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी केली.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले – मराठ्यांना ओबीसीत सामावून आरक्षणाच्या ५२ टक्क्यांच्या मर्यादेत बसवून घ्यावे.

मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या संघर्षात तोडगा काढण्यासाठी मराठा सेवा संघाने सत्तारूढ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याही भेटी घेण्याची मोहीम सुरू केली आहे. या आरक्षण आंदोलनातील एक प्रमुख संघटना मराठा क्रांती मोर्चाही या दिशेने प्रयत्न करत आहे.

मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सुनावणीसाठी विस्तारित खंडपीठ स्थापन करा, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) मुख्य मन्यायाधीशांकडे केली आहे.

ही बातमी पण वाचा : गैरसमज पसरवू नका; मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही – जयंत पाटील 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER