मराठा समाज आरक्षण : ठाकरे सरकारच्या निर्णयाचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत

Chandra Kant Patil & Uddhav Thackeray

मुंबई : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा आरक्षणासंबंधी सकारात्मक पाऊल टाकले असून मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राज्य सरकारने मराठा बांधवांना दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने घेतलेल्या निर्णयाचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील  (Chandrakant Patil) यांनी स्वागत केले आहे.

तसेच, सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले आहे. खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणप्रश्नी प्रयत्न करत असून लवकरच पंतप्रधान त्यांना भेट देतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पण हा मुद्दा केंद्र सरकारचा नसल्याचंदेखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर, दुसरीकडे पाटील यांनी मुंबईची तुंबई झाल्यानंतर टीकाही केली आहे. जगात विविध तंत्रज्ञान उपलब्ध असताना त्याचा का वापर केला जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

तर निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काम दिल्याने मुंबईची अशी अवस्था होत असल्याची टीका त्यांनी केलीय. मुंबई महापालिका कायम शिवसेनेकडे आहे. नागरी सुविधा देण्यात ती कमी पडते. सरकारमध्ये आणि पालिकेतही शिवसेना आहे. मग काय अडचण आहे हे कळत नाही. दरवर्षी मुंबईत पाणी साचतं, त्यावर नियोजन नको का करायला? शिवसेनेचे  नेहमी आलेला दिवस ढकलण्याचे काम चालले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER