मराठा आरक्षण : ओबीसींच्या मनातील भीती दूर करण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी अयशस्वी : प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar

नवी दिल्ली: मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी कांग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कोणताही प्रयत्न करताना दिसत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यानी केली तसेच सरकारने अ आणि ब अशी वर्गवारी करून मराठा समाजाला ब वर्गात टाकावे, अशी मागणीही आंबेडकर यानी केली.

ओबीसी आरक्षण शाबूत ठेवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या तरच देशातील सर्व घटकांचे आरक्षण टिकेल. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आणि ओबीसी समजाला आरक्षण देऊ असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. देशभरात आरक्षणावरून गोंधळ असल्याचे म्हणत त्यांनी या मुद्दावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली.

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरविल्यानंतर यंदाच्या वर्षापासून मराठा समाजाला शिक्षणात 12 तर नोकरीत 13 टक्के आरक्षण लागू झाले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने यावर्षीपासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.