मराठा आरक्षण : कायदा समजून न घेता, विरोधक सरकारला दोषी ठरवतात – अजित पवार

Ajit Pawar

पुणे : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सक्षमपणे बाजू मांडली. मात्र दुर्दैवाने आरक्षण रद्द झाले. या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया समजून न घेताच विरोधक महाविकास आघाडी सरकारला दोषी ठरवत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांवर केली.

पुणे जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणालेत, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या वकिलांनी बाजू मांडत आरक्षण टिकवले. तेच वकील सर्वोच्च न्यायालयातही बाजू मांडत होते. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते. तर आम्हीच या कायद्याचा पाठपुरावा केला होता. त्यामुळेच ते मंजूर झाले, असे विरोधक म्हणाले असते व स्वतःची पाठ थोपटण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता. मात्र, न्यायालयात निकाल विरोधात गेल्यामुळे ते आमच्यावर आता टीका करून या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button