मराठा आरक्षण : महाधिवक्ता यांनी कोर्टात बाजू का मांडली नाही? ; संभाजीराजे संतापले

Sambhaji Raje-Maratha Reservation

मुंबई :  मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)सर्वांनी एकत्रित लढा देणे आवश्यक होते. सर्वांनी एकजूट होऊन आरक्षणण टिकववण्याचा प्रयत्न करायला हवा होता. पहिल्या दिवसापासून मी ही तळमळ बोलून दाखवत आहो मात्र, अखेर मराठा समाजाच्या पदरी निराशाच आली आहे. असे सांगत महाधिवक्ता यांनीही कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू का नाही मांडली असा प्रस्न खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje)यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले, महाधिवक्ता यांनी कोर्टात बाजू का मांडली नाही? मी सुप्रीम कोर्टात (SC) सुनावणीला हजर रहायचो पण महाधिवक्ता कधी दिसले नाही. ॲानलाईन सुनावणीनं पण हजर राहीले नाही. यावरून एकूणच मराठा आरक्षणाची बाजू मांडताना वकीलांचा समन्वय नसल्याचं स्पष्ट झालं असा संताप संभाजी राजेंनी झी चोवीसतासशी बोलताना व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना संभाजी राजे म्हणाले, मी खासदार असण्यापेक्षाही एक मराठा समाजसेवक आहे. राजकारणापेक्षाही मराठा समाजाशी माझी नाळ घट्ट आहे.

तसेच सुप्रिम कोर्टात हे आरक्षण स्थगित झाल्याने त्यांनी संताप व्यक्त करत मी बोललो तर अजून वादळ येईल असेही विधान केले आहे. तसेच, वेळ आली की बोलेन असेही ते म्हमाले. संभाजीराजे नेमके हे कोणाबद्दल बोलले हे कळू शकले नाही.

दरम्यान, माजी मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनीही एक जाहीर पत्रक काढले असून या पत्रकाद्वारे त्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडताना महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या निष्काळजीपणामुळे आणि हजर न झाल्यामुळे हा स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयाने पारीत केलेला आहे असे त्या पत्रकात म्हटले आहे. संबंधीत पत्रक आम्ही बातमीत पोस्ट करत आहोत. या पत्रकात मराठा आरक्षणाबाबत नेमका कुठे हलगर्जीपणा झाला याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER