मराठा आरक्षण : पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते काय केले? संभाजीराजेंच्या भेटीवरून नारायण राणेंची टीका

narayan rane - Sambhajiraje Chhatrapati - Maharashtra Today

मुंबई : संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करत आहेत. गुरुवारी त्यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) मुंबईत भेट घेतली. त्यानंतर मनसे (MNS Chief) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही भेट घेतली. खासदार आणि भाजपाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी या भेटींवरून टीका केली आहे. तसंच मुख्यंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत.

राणे म्हणालेत, संभाजीराजे ज्यांच्या दारी फिरत आहेत, त्यांनी काय केले. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी काय केले ? राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात सांगणार का असा प्रश्न केला.

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार गंभीर नाही असे विधान संभाजीराजे यांनी केले होते. यावर, खासदारकी दिली त्यांच्या संदर्भात असे विधान बोलणे, योग्य नाही, असे नारायण राणे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण भाजपा सरकारने दिले. पण ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत किती गंभीर आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे मराठा समाज्याला आरक्षण द्यावे या मताचे नाहीत, असा आरोप नारायण राणेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button