मराठा आरक्षण : मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटलांवर गुन्हा दाखल

Maharashtra Today

बीड : मराठा समाजाला आरक्षण(Maratha reservation) मिळावे तसेच विविध मागण्या राज्य शासनाने पूर्ण कराव्यात, यासाठी बीडमध्ये आ. विनायक मेटे, माजी आ. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५ जून रोजी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे(Vinayak Mete ) आणि नरेंद्र पाटील (Narendra Patil)यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसह जवळपास अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विनायक मेटे यांनी ठाकरे सरकार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी मेटे यांनी आघाडी सरकारवर टीका करत या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले, असे सांगितले. आघाडी सरकारने आरक्षणासाठी वरिष्ठ न्यायालयात अद्याप याचिका दाखल केलेली नाही, असे आ. मेटे म्हणाले.अशोक चव्हाण यांच्यासारखा नाकर्ता माणूस आजपर्यंत झालेला नाही. अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा बापट आयोगाच्या शिफारशी फेटाळण्याची मागणी आम्ही केली होती. पण त्याकडे अशोक चव्हाण यांनी दुर्लक्ष केलं. 2014 ला सुद्धा जे आरक्षण दिलं ते ही चुकीचं दिलं, त्याची फळं आज आपण भोगतोय. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षण अतिशय चांगलं होतं. पण या माणसाच्या मुर्खपणामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या दुर्लक्षामुळे घालवलं. अशोक चव्हाण यांची आरक्षण समितीवरील निवड ही चुकीची असून त्यांनी समितीचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. इतकच नाही तर मराठा आरक्षण, मराठा समाजाला सवलती आणि अशोक चव्हाण यांचा राजीनामा घ्या. त्यासाठी ५ जुलैपर्यंतची वेळ देतो. नाहीतर ७ जुलैला होणारं पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button