मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी कोल्हापूर महापालिकेची आजची सभा रद्द

Kolhapur Municipal Corporation.jpg

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) पाठिंब्यासाठी महापालिकेची आज होणारी महासभा व स्थायी समितीची सभा ही रद्द करण्यात आली आहे. महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील, शिवसेना गटनेता राहुल चव्हाण यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाबाबत चर्चेसाठी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. तीनवेळा पत्रव्यवहार करूनही मराठा आरक्षण सारख्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. यावरूनच केंद्र सरकारची मराठा आरक्षणबाबतची भूमिका स्पष्ट होते. केंद्र सरकारच्या या भूमिका कोल्हापूर महापालिकेतील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे नगरसेवक निषेध करीत आहोत.

सरकारने दिलेले आरक्षण व केंद्र सरकारने सवर्णासाठी दिलेले आरक्षण ही दोन्ही प्रकरणे प्रलंबित असताना मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या स्थगिती निर्णय धक्कादायक आहे. सर्वसामान्य मराठा समाजासाठी आरक्षण निर्णय मार्गी लागणे गरजेचे आहे. मराठा समाजाची बाजू मांडण्यात राज्य शासन कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास आहे. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर महापालिकेतील सर्व नगरसवेकांचा पाठिंबा आहे. म्हणून गुरुवारी होणारी स्थायी समिती सभा व शुक्रवारी होणारी महासभा रद्द करीत आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER